Goa Opinion Poll Day 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa Opinion Poll Day 2025: रुपेरी पडद्यावर उलगडणार ‘16 जानेर’चा संघर्ष; ‘ओपिनियन पोल’वर ‘डॉक्यु-फिक्शन’

Goa Opinion Poll Film: १६ जानेवारी १९६७ रोजी झालेल्या या ऐतिहासिक ‘ओपिनियन पोल’चा प्रवास आता रुपेरी पडद्यावर येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: देशाच्या इतिहासातील पहिला आणि शेवटचा ‘ओपिनियन पोल’ झाला तो गोव्यासाठी. पोर्तुगिजांच्या करालपाशातून गोव्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोव्याचे अस्तित्व स्वतंत्र राज्य म्हणून राखायचे की महाराष्ट्रात विलीन करायचे यासाठी तत्कालीन केंद्र सरकारने घेतलेला अभूतपूर्व निर्णय म्हणून ‘ओपिनियन पोल’ अर्थात ‘सार्वमत कौल’. १६ जानेवारी १९६७ रोजी झालेल्या या ऐतिहासिक ‘ओपिनियन पोल’चा प्रवास आता रुपेरी पडद्यावर येत आहे. ‘सहित स्टुडिओ’च्या ‘गोवाज्‌ ओरल हिस्टरी’ उपक्रमांअंतर्गत ‘१६ जानेर’ या पहिल्या भागाची घोषणा ‘ओपिनियन पोल’दिनानिमित्त करण्यात आली.

आपल्या ‘माणकुल्या’ गोव्याने (Goa) स्वतःच्या सबळ अस्तित्वासाठी देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा जास्त संघर्ष पाहिला आणि केला आहे. आजचा गोवा हा आपल्या सर्व पूर्वसुरींच्या संघर्षाच्या पायावरच उभा आहे. त्यामुळेच आजही आपण आपली स्वतंत्र अस्मिता टिकवून आहोत. पण खेदाची बाब म्हणजे गोव्याचा हा सगळा संघर्षाचा प्रवास गोव्यातील नव्या पिढीपर्यंत आणि त्याचबरोबर गोव्याबाहेरील जनतेपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचलाच नाही. याला अर्थात अनेक करणे असू शकतील, पण आता माध्यमक्रांतीनंतर तरी वेगवेगळ्या माध्यमातून गोव्याचा हा संघर्ष राज्यासोबतच जगभरात पोहोचवलाच पाहिजे, असे आम्हाला गेल्या काही वर्षांपासून प्रकर्षाने वाटत होते. त्यातूनच ‘गोवाज्‌ ओरल हिस्टरी'' उपक्रम पुढे आला आणि त्यातील पहिला भाग आम्ही ‘ओपिनियन पोल’वर साकारत आहोत, असे या प्रकल्पाचे संशोधक, लेखक आणि दिग्दर्शक किशोर अर्जुन यांनी सांगितले.

१६ जानेवारी १९६७ रोजी गोव्याने स्वतंत्र राज्याच्या बाजूने आपला कौल देण्यापूर्वी राज्यात आणि देशात यासंदर्भात काय काय घडामोडी घडल्‍या इथपासून ते आज त्या सगळ्या संघर्षाचा राज्याला आणि पर्यायाने गोमंतकीयांना काय फायदा-तोटा वाटतो आहे, असा एक मोठा पट ‘१६ जानेर’मधून आम्ही उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी विविध अभ्यासक आणि या लढ्यात प्रत्यक्ष सक्रिय सहभाग घेतलेल्यांच्या सविस्तर मुलाखती, ऐतिहासिक दस्तऐवजीकरणाचे दाखले आणि जगभरातील या विषयावरील महत्त्‍वपूर्ण संदर्भ यांचा या ‘डॉक्यु-फिक्शन’मध्ये प्रामुख्याने समावेश असल्याचे किशोर अर्जुन यांनी यावेळी नमूद केले. लवकरच सदर माहितीपट पूर्णत्वाला नेऊन विविध आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवांत पाठवण्यात येणार असल्याचेही त्‍यांनी सांगितले.

१६ जानेवारी १९६७ रोजी गोव्याने स्वतंत्र राज्याच्या बाजूने आपला कौल देण्यापूर्वी राज्यात आणि देशात यासंदर्भात काय काय घडामोडी घडल्‍या इथपासून ते आज त्या सगळ्या संघर्षाचा राज्याला आणि पर्यायाने गोमंतकीयांना काय फायदा-तोटा झाला, असा एक मोठा पट ‘१६ जानेर’मधून आम्ही उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत.

- किशोर अर्जुन, लेखक/दिग्दर्शक

दुर्मीळ छायाचित्रे, कागदपत्रांसाठी आवाहन

लोकवर्गणी आणि लोकसहकार्यातून साकारण्यात येत असलेल्या या माहितीपटासाठी आम्ही विविध व्यक्ती, पुस्तके, ग्रंथालये आणि इंटरनेटवर भेट देऊन कित्येक दुर्मीळ छायाचित्रे आणि कागदपत्रे संकलित केली आहेत. तरी देखील काही व्यक्तींकडे अद्याप अजून वेगळी माहिती, छायाचित्रे किंवा कागदपत्रे असू शकतात आणि त्यांचा या माहितीपटासाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे गोमंतकीयांनी सदर माहिती, छायाचित्रे, कागदपत्रांच्या नक्कलप्रती edit.sahit@gmail.com येथे पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करत ‘सहित स्टुडिओ’च्या वतीने आजवर निर्माण करण्यात आलेल्या विविध कोकणी लघुपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान मिळाल्यामुळे सदर उपक्रमाबद्दल आम्ही अधिक आश्‍‍वस्‍त असल्याचे यावेळी ‘सहित’च्या रश्मी नर्से आणि सुनंदा काळुसकर यांनी सांगितले.

राजकीय व्यवस्थेवर ताशेरे

आज प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे, पण ती केवळ भ्रष्टाचारासाठी. गोव्यात आज गोमंतकीयांपेक्षा बाहेरचे लोक जास्त आहेत. जागा आणि सत्त्व विकण्यासाठी बाजारात ठेवले जात आहे. त्‍यामुळे गोव्याचा गाभा नष्ट होत चालला आहे. गोवा महाराष्ट्रात (Maharashtra) विलीन होण्याचा प्रस्ताव नाकारण्यामागे जॅक सिक्वेरा यांचे मोठे योगदान आहे. चर्चनेही प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली, असे राजू नायक म्‍हणाले.

महत्त्वाचे मुद्दे

गोवा मुक्ती चळवळ आणि जनमत कौलाचा सांस्कृतिक प्रभाव.

युवकांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा.

कोकणी भाषा व गोव्याचे इंद्रधनुष्य रूप टिकवणे आवश्यक.

जागा विकणे आणि निसर्गाचा ऱ्हास थांबवण्यासाठी राजकीय, सामाजिक चळवळ उभारण्याची गरज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

SCROLL FOR NEXT