Goa Comunidate Dainik Gomantak
गोवा

Goa Comunidate: सांकवाळमध्ये 16 बेकायदा घरे भुईसपाट

Goa Comunidate: कोमुनिदाद प्रशासकांचा बडगा : 31 अतिक्रमणकर्त्यांना बजावली होती नोटीस

दैनिक गोमन्तक

Goa Comunidate: सांकवाळ कोमुनिदादीच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करून उभारलेल्या ३१ हून अधिक अतिक्रमणकर्त्यांना नोटीस बजावली होती. तरीही हे अतिक्रमण न हटविल्याने दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकांनी आज ही घरे पाडण्याची मोहीम राबवली.

बुधवारी दिवसभरात १६ घरे जेसीबीने भुईसपाट केली. प्रत्यक्षात येथे ज्यांची नोंदणीच नाही, अशी मिळून ६४ बेकायदा बांधकामे आहेत. सकाळी ११ वाजता कारवाईस

सुरवात झाली. संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत १६ घरे जमीनदोस्त केली. याबाबतचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा अतिक्रमण हटाव पथकाचे प्रभारी उदय प्रभुदेसाई यांनी जारी केला होता.

सांकवाळ कोमुनिदादच्या सर्वे क्र. १५४/१ आणि ९०/१ या जमिनींमध्ये अतिक्रमण करून तब्बल ६२ बांधकामे उभारली आहेत. याप्रकरणी वेर्णा पोलिस, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासक यांच्याकडे तक्रार नोंदवली होती.

मात्र, संबंधित यंत्रणा कारवाई करत नसल्यामुळे सांकवाळ कोमुनिदादचे ॲटर्नी जयेश फडते यांनी गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती.

खंडपीठाने पंचायत उपसंचालक आणि मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाच्या (एमपीडीए) सदस्य सचिवांना दोन्ही जमिनींतील बांधकामांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे, तसेच कारवाईचे निर्देश दिले.

संबंधितांनी पाहणी केली असता, अतिक्रमण केल्याचे उघड झाले. दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकांनी २० ऑक्टोबर रोजी अतिक्रमण हटवण्यासाठी पथकाची मागणी केली. त्यानुसार बुधवारी (२९) ही मोहीम हाती घेतली.

अतिक्रमणकर्त्यांची विनंती धुडकावली

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. घटनास्थळी सांकवाळ कोमुनिदादचे अध्यक्ष प्रताप म्हार्दोळकर, ॲटर्नी जयेश फडते, खजिनदार श्रीनिवास नाईक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

‘आमची घरे मोडू नका’ अशी याचना काही घरमालक संबंधित अधिकाऱ्यांकडे करत होते; परंतु न्यायालयाचे आदेश असल्याने त्यांचे काहीच चालले नाही.

आजही होणार कारवाई

या जागेतील अतिक्रमणकर्त्यांना महिन्याअगोदर नोटीस बजावली होती. तरीही त्यांनी हे अतिक्रमण स्वत:हून हटविले नव्हते. म्हणून त्यांना आज जबरदस्तीने घरे खाली करण्यास भाग पाडले.

बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून कारवाईस सुरुवात झाली. ३१ बेकायदा बांधकामे उभारल्याची माहिती खंडपीठाला दिली असली तरी नोंदणी नसलेली मिळून ६४ घरे आहेत. या सर्व घरांवर उद्या (३०) कारवाई करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT