Travellers

 

Dainik Gomantak 

गोवा

कझाकिस्तानमधून 159 विदेशी प्रवासी गोव्यात दाखल !

याच पाश्वभूमीवर 159 विदेशी पर्यटकांना घेऊन आज सकाळी 7 वाजता पर्यटन हंगामातील पहिले चार्टर विमान "एअर अस्ताना" (Air Astana) हे कझाकिस्तान (Kazakhstan) मधून गोव्यात (Goa) दाबोळी विमानतळावर दाखल झाले.

दैनिक गोमन्तक

वास्को: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा (corona virus) हाहाकार वाढू लागला आहे. यातच कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंट जगभरात धुमाकुळ घातला आहे. याच पाश्वभूमीवर 159 विदेशी पर्यटकांना घेऊन आज सकाळी 7 वाजता पर्यटन हंगामातील पहिले चार्टर विमान "एअर अस्ताना" (Air Astana) हे कझाकिस्तान (Kazakhstan) मधून गोव्यात (Goa) दाबोळी विमानतळावर (Daboli Airport) दाखल झाले. कोविड महामारी सावटाखाली " एअर अस्ताना" हे चार्टर अभिमान अलमाटी कझाकिस्तान येथून आज गोव्यात दाखल झाले. 159 विदेशी प्रवाशांना घेऊन सकाळी 7 वाजता सदर विमान दाबोळी विमानतळावर उतरले. या पहिल्या चार्टर विमानातल प्रवाशांच्या स्वागतासाठी दाबोळी विमानतळावर खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो (Mavin Gudinho) उपस्थित होते. तसेच दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक उपस्थित होते. यावेळी वाहतूक मंत्री यांच्या हस्ते केक कापून या चार्टर फ्लाईट पर्यटन हंगामाची सुरुवात केली. यावेळी पर्यटकांचे पर्यटन खात्याने गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. तसेच बँड वादनाची खास व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान चार्टर विमानातून आलेल्या पर्यटकांची रॅपिड कोविक चाचणीची व्यवस्था दाबोळी विमानतळावरील गेली कित्येक वर्षे बंद असलेली पांढरा हत्ती बनून राहिलेल्या पार्किंग इमारतीत करण्यात आली होती. यावेळी खास वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात आले होते. त्यांची कोविड चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल मिळेपर्यंत त्यांना तिथे बसवून ठेवण्यात आले. चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. याविषयी माविन गुदिन्हो यांनी समाधान व्यक्त करताना कोविड महामारी नंतर दोन वर्षाच्या कार्यकाळा नंतर आज पहिले चार्टर विमान गोव्यात दाबोळी विमानतळावर दाखल झाले. त्यामुळे गोव्याच्या पर्यटनाला वाव मिळालेला आहे. पर्यटकांच्या आगमनाने गोव्यातील पर्यटनाला वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. गोवा हे अख्ख्या जगाने प्राधान्य दिलेले पर्यटन स्थळ आहे. पर्यटक जास्त गोव्यात पर्यटनास प्राधान्य देतात. गोव्याचे पर्यटन हे विदेशी पर्यटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे गोव्याचा आर्थिक कणा पर्यटन आहे. मायनिंग बंद होऊन आता कित्येक वर्षे झाली त्यामुळे गोव्याचा आर्थिक कणा कमकुवत झाला होता. याची उणीव आता पर्यटन हंगामात पर्यटकांकडून भरून निघते. पर्यटन हंगाम यामुळे राज्यातील हॉटेल्स पर्यटकांनी भरलेली आहेत ही एक चांगली गोष्ट आहे. केंद्राने घालून दिलेल्या कोविड प्रोटोकॉल नुसार पर्यटकांची योग्य तपासणी करूनच योग्य ती खबरदारी घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले.

दाबोळी विमानतळ संचालक जगन मलिक यांनी आज पहिले चार्टर फ्लाइट दाबोळी विमानतळावर दाखल झाले, त्यानुसार विमानतळावर सर्व खबरदारी घेऊन केंद्राने घालून दिलेल्या कोविड प्रणालीनुसार पर्यटकांची कोविड चाचणी करण्यास व्यवस्था केली गेली. तसेच यापुढे आणखी विदेशी पर्यटकांची संख्या वाढणार असून आणखीन तीन चार विमाने दाखल होणार असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT