इंग्लंडहून गोव्यात आलेला 41 वर्षीय ब्रिटीश नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

दाबोळी विमानतळावर शुक्रवारी सकाळी मूळ‌ गोव्यातील (Goa) 41 वर्षीय ब्रिटीश नागरिक कोविड पॉझिटिव्ह सापडला आहे.
Daboli Airport
Daboli AirportDainik Gomantak

दाबोळी विमानतळावर (Daboli Airport) शुक्रवारी सकाळी मूळ‌ गोव्यातील 41 वर्षीय ब्रिटीश नागरिक (British Citizens) कोविड पॉझिटिव्ह (covid positive) सापडला आहे. तसंच इंग्लंडहून (England) शुक्रवारी सकाळी गोव्यात (Goa) आलेल्या विमानातील 3 प्रवाशी कोविडबाधित असल्याचं निदान झालं आहे, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी निदान झालेली 41 वर्षीय मूळ गोमंतकीय ब्रिटीश नागरिक ही कोविडबाधित असल्याचं निदान झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान त्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली की नाही याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. व्यक्तीचे नमुने ओमायक्रॉनच्या (Omycron) चाचणीसाठी पुण्यात पाठवले असून अहवाल येण्याची वाट पहावी लागणार आहे. तोवर व्यक्तीला कांसावली येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये विलिनीकरणात ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Daboli Airport
BJP मंत्र्याचे सेक्स स्‍कँडल प्रकरण हाताळण्यात मुख्यमंत्री सावंत अपयशी

दरम्यान युक्रेहून शुक्रवारी सकाळी गोव्यात आलेल्या एआय 146 फ्लाईटमधील 3 प्रवासी कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. या फ्लाईटमध्ये एकूण 237 प्रवासी होते. पैकी तिघांचा कोविड चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला. इतर प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह आले. ज्या प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह आलेत, त्यांना स्ट्रीक्ट होम आयझोलेशनमध्ये ठेवले जाणार आहे आणि कोविडची लक्षणे आढळल्यास 8 व्या दिवशी किंवा त्यापूर्वी त्यांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. दरम्यान भारत सरकारची मार्गदर्शक तत्त्वे प्रोटोकॉलनुसार, या संदर्भात आरोग्य सेवा संचालनालयाला आवश्यक निर्देश जारी करण्यात आले आहे.

दरम्यान दाबोळी विमानतळावर येणाऱ्या प्रवशांसाठी रॅपिड पीसीआर चाचण्यांचे दर गुरुवार पासून घटवण्याचा निर्णय भारतीय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे, प्रवाशांच्या सोयीसाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 9 डिसेंबर पासून सुधारित दर लागू केले आहेत. रॅपिड पीसीआर चाचणीसाठी 3200 रुपये आकार ले जात होते. आता या चाचणीसाठी 2400 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com