Goa Medical College Dainik Gomantak
गोवा

Goa Sports News: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवेळी 151 खेळाडूंवर उपचार

Goa Sports News: पणजी नुकत्‍याच संपलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवेळी विविध राज्यांतील जखमी झालेल्या 151 खेळाडूंवर उपचार करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Goa Sports News: पणजी नुकत्‍याच संपलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवेळी विविध राज्यांतील जखमी झालेल्या 151 खेळाडूंवर उपचार करण्यात आले. त्यापैकी फ्रॅक्चर झालेल्‍या 6 खेळाडूंवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

स्पर्धेवेळी जखमी खेळाडूंवर उपचार करण्यासाठी आपत्कालीन विशेष विभाग 24 तास स्थापन करण्यात आला होता. सुमारे 130 हून अधिक खेळाडूंवर उपचार करून त्याना त्वरित डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक राजेश पाटील यांनी दिली. स्पर्धेवेळी गोमेकॉ इस्पितळात स्थापन करण्यात आलेल्या विशेष विभागात 24 तास 21 डॉक्टर उपचार तसेच शस्त्रक्रियांसाठी उपलब्ध होते. त्यामुळेच जखमी

खेळाडूंवर योग्‍य वेळी योग्‍य उपचार झाले. शिवाय इस्पितळात उपचारासाठी दाखल करून घेतलेल्या खेळाडूंसाठी सहा खासगी खोल्‍या होत्‍या. दोन ऑपरेशन थिएटर शस्त्रक्रियेसाठी तयार ठेवण्यात आली होती.

स्पर्धेदरम्यान 21 खेळाडूंना गंभीर जखमा झाल्‍या. त्‍यातील सहाजणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांचे पथक फिजिओथेरपीसाठी तयार होते. त्याचा फायदा खेळाडूंना झाला. विविध राज्यांच्या संघांसोबत आलेल्या दोन-तीन अधिकाऱ्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांनाही गोमेकॉच्या विशेष विभागात आणण्यात आले होते. त्यांच्‍यावर उपचार करून दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज देण्‍यात आला.

गेल्यावर्षी राष्ट्रीय स्पर्धा गुजरातमध्ये झाल्या होत्या. त्यावेळी तेथील उपचार व्यवस्था तसेच कोणत्या क्रीडा प्रकारांत खेळाडू अधिक जखमी होतात याची पूर्ण माहिती घेऊन त्यानुसार आम्‍ही गोव्‍यात तयारी ठेवली होती. लुसोफोनिया स्‍पर्धांचा अनुभवही कामी आला.
- राजेश पाटील, वैद्यकीय अधीक्षक (गोमेकॉ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रौर्याचा कळस! होमवर्क न केल्यानं 4 वर्षांच्या मुलाला कपडे काढून झाडावर लटकवलं, पाहा व्हिडिओ

Margao: मडगावात शनिवारी वीजपुरवठा खंडित! 'या' भागांमध्ये चालणार दुरुस्तीचं काम

Bicholim: डिचोली 'राधाकृष्ण'मध्ये पोषक आहारावर कार्यशाळा उत्साहात; डिचोली रोटरी क्लबतर्फे आयोजन, प्रश्नमंजूषा स्पर्धेलाही प्रतिसाद

Goa Tourism: पर्यटन हंगामास सुरुवात; विदेशी पर्यटकांची संख्या घटली, देशी पर्यटकांत वाढ

Goa Crime: 45 दिवसांत 10 अल्‍पवयीनांची अपहरणे, दक्षिण गोव्यात घर सोडून जाण्याचे प्रकार वाढले

SCROLL FOR NEXT