IFFI Goa 2023: इफ्फीचा पडदा आज उघडणार!

54th IFFI: गोवा सज्ज : राजधानी पणजीत आकर्षक सजावट; सिनेप्रेमींचा उत्‍साह शिगेला
54th International Film Festival of India 2023
54th International Film Festival of India 2023Dainik Gomantak

IFFI 2023 Goa: 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गोवा सज्ज बनले आहे. आज सोमवारी इफ्फीचा पडदा उघडणार आहे. तत्पूर्वी, आज रविवारी ताळगाव पठारावरील डॉ. श्‍‍यामाप्रसाद मुखर्जी स्‍टेडियमवर रंगीत तालीम पार पडली.

54th International Film Festival of India 2023
Goa Death Case: अनुपमाच्‍या आत्‍महत्‍येचे कारण अस्‍पष्‍टच

इफ्‍फीसाठी राजधानी पणजी शहर नववधूसारखे नटले आहे. आयनॉक्स परिसरात आकर्षग रोषणाई करण्‍यात आली असून, ती लक्ष वेधून घेत आहे. डॉ. श्‍‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमच्या प्रवेशद्वाराबाहेर उभारण्यात आलेल्या कमानी महोत्सवाचे वातावरण तयार करीत आहेत.

आयनॉक्स थिएटर परिसर इफ्फीच्या आयोजनातील मुख्य स्थान असल्याने या परिसरात रेड कार्पेट, येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत कक्ष, शिवाय महोत्सव आयोजन करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) विविध विभाग कार्यरत असतात.

बाजूलाच असलेल्या गोवा मनोरंजन संस्थेच्या दोन थिएटरचा या महोत्सवासाठी उपयोग होत असल्याने व संस्थेच्या कार्यालयात इतर कामकाजाच्या नियोजनाचे काम चालत असल्याने या परिसरालाही दरवर्षीप्रमाणे झळाळी देण्यात आली आहे.

जुन्या गोमेकॉ इमारतीच्या दयानंद बांदोडकर मार्गाकडे तोंड असलेल्या प्रवेशद्वारावर रेड कार्पेटचे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. आयनॉक्स परिसरातही रेडकार्पेट असल्याने हा परिसर सुशोभीत करण्याचे काम रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याच परिसरात विविध स्टॉल्‍स उभारले जाणार आहेत. त्‍यामुळे हा परिसर शामियाना उभारून आच्छादित करण्‍यात आलाय.

स्टार मांदियाळी

इफ्‍फीच्‍या उद्‌घाटन सोहळ्‍याला ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित, शाहीद कपूर, श्रीया सरीन या बॉलिवूड कलाकारांसह हॉलिवूड अभिनेते व निर्माते मायकल डग्लस यांचीही उपस्‍थिती असेल. त्‍यांना यावर्षीचा ‘सत्यजीत रे जीवनगौरव'' पुरस्कार दिला जाणार आहे. केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार श्रीपाद नाईक यांच्यासह मंत्री आणि आमदारांची उपस्थिती असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com