Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : बेघरांची पहिली रात्र रस्त्यावर! डासांचा त्रास

Mapusa News : छत हरपल्याने सांगोल्डातील २०० लोकांचा आक्रोश

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News :

म्हापसा, सांगोल्डामधील कोमुनिदाद जागेतील बेकायदा २२ घरांपैकी १५ घरे शुक्रवारी (ता.१२) पाडल्यानंतर त्या रात्री लोकांवर बाहेर रस्त्यावर झोपण्याची वेळ ओढवली. रात्रभर डासांसह उकाड्याचा सामना करावा लागल्याने रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मुळात, आमचे घर आमच्यासाठी सर्वस्व होते; परंतु सरकारने आमचा आधारच हिरावून घेतला, अशा शब्दांत सांगोल्डामधील त्या २२ घरांतील कुटुंबीयांनी आपली कैफियत मांडली. या कारवाईनंतर जवळपास २०० लोक बेघर झाले आहेत.

आम्ही हातावर पोट असणारी माणसे. आम्ही कुठल्या मोठ्या बंगल्यात वास्तव्यास नव्हतो. ४० ते ५० चौरस मीटरच्या जागेत छोट्याशा खोलीत आम्ही राहायचो. तेसुद्धा सरकारला व भाटकाराला पाहवले नाही, असे म्हणत बेघर झालेल्यांनी आक्रोश व्यक्त केला.

माझा व माझ्या मुलाबाळांचा जन्म इथलाच. मग मी बाहेरचा कसा? पणजीत मी रापणीचा व्यवसाय करतो. घर बांधण्यासाठी मी आयुष्यभराची पुंजी खर्च केली. मात्र, माझे तेच घर हिरावून घेण्यात आले.

आता आम्ही जगायचे कसे अन् खायचे काय? शुक्रवारी डिमॉलिशन प्रक्रियेवेळी येथील एकजण अधिकाऱ्यांचा विरोध करताना पडून जखमी झाला. तर दुसऱ्याने आक्रोशापोटी केरोसीन पिऊन ही प्रक्रिया खंडित करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघांवर सध्या गोमेकॉत उपचार सुरू आहेत. घर पाडून आमचे सर्वस्व हिरावून घेतले, असे म्हणत रहिवासी रफिक तलवार यांनी रोष व्यक्त केला.

एका मुस्लिम महिलेने सांगितले की, आपण मुलाबाळांसह एकटीच राहते. घरकाम करून कुटुंबाची गुजराण करते. आता मी जाऊ कुठे? मुळात सहजासहजी मुस्लिमांना कुणीही भाड्याने घर देत नाहीत. इथे आपली लहानशी खोपवजा खोली होती, ती पाडल्याने आता रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.

निवारा मिळेपर्यंत हलणार नाही!

एका युवतीने सांगितले की, माझे बाबा पक्षाघाताचे रुग्ण आहेत. अशा स्थितीत त्यांना कुठे घेऊन जायचे? सरकार गरीबांना रोजगार तसेच मुलींच्या संरक्षणाच्या बढाया मारते आणि याउलट आमचा निवारा हिसकावून घेते. सरकारला खरेच गरीबांचे पडले आहे का? आम्हाला पर्यायी निवारा मिळेपर्यंत आम्ही इथून हलायचे नाही, असा निर्धार सर्वांनी केला आहे.

मग आम्ही बेकायदेशीर कसे?

लोकप्रतिनिधी व सरकारला निवडणुकीच्या काळात आमची मते हवी असतात. मात्र, त्यानंतर आमच्याकडे कुणीही ढुंकून पाहत नाही. सर्वांना स्थलांतरितांची मते हवीत; परंतु आम्ही नको? हा कुठला कायदा? असा सवाल बेघर झालेल्यांनी उपस्थित केला. मुळात चाळीस वर्षांपासून आम्ही इथे वास्तव्य करतो. इथे काम-व्यवसाय करतो, मग आम्ही बेकायदेशीर कसे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

विद्यार्थी, नोकरदारांचे हाल

बेघर झालेल्यांपैकी आरिफ म्हणाला की, आमच्या घरांवर मागील काही दिवसांपासून टांगती तलवार होती. त्यामुळे अधून-मधून आम्ही कामावर रजा टाकायचो. आता बेघर झाल्याने आम्ही रस्त्यावरच आलो आहोत, तर दुसरीकडे कामावर रजेचा प्रश्न उपस्थित झाला.

कारण, पुन्हा-पुन्हा रजा घेत असल्याने मालक त्रागा करतात. तसेच काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, घर नसल्याने शिक्षणाचा प्रश्नही निर्माण झाला असून, सध्या परीक्षा तोंडावर आल्याने आता अभ्यास कसा आणि कुठे करायचा हा चिंतेचा विषय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT