Court  Dainik Gomantak
गोवा

कळंगुट येथील रेस्टॉरंट तोडफोड प्रकरणात 14 जणांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

डिसेंबरच्या अखेरीस संशयितांनी सौझा यांच्या रेस्टॉरंटवर शस्त्रे घेऊन हल्ला केला होता.

दैनिक गोमन्तक

पणजी: कळंगुट येथील सौझा रेस्टॉरंट तोडफोड प्रकरणातील 15 संशयितांनी जामिनासाठी केलेल्या अर्जापैकी म्हापसा न्यायालयाने 14 जणांचा अर्ज फेटाळला तर एकाला सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणाचा तपास सीआयडी क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक राहुल परब करत आहेत. (Goa News Update)

या रेस्टॉरंट तोडफोड प्रकरणी पोलिसांनी (Police) 18 संशयितांना अटक केली होती. त्यापैकी आज 15 जणांचे जामीन अर्ज सुनावणीसाठी आले. त्‍यात राहुल सुरेंदर, भोला राठोड, सुनील ऊर्फ सुरेंद्र रामदास राठोड, गजेंद्र सिंग ऊर्फ छोटू रोतन सिंग, सीताराम अनंत शिरोडकर, अविनाश रामनाथ सिंग, विजय प्रकाश व्‍यंकटरमण्णा, संतोष चंद्रदास रामचंद्र दास, सोहेल ऊर्फ साहेल रामण्‍णा, अन्वर हुसेन, हेमंतकुमार मोरसिंग जोशी ऊर्फ गिल, सुनील नारायण भोमकर, पुष्पेंद्र शाजराम मिना, मोहम्मद सादिक ऊर्फ लिंबू, नूर अहमद नदाफ, सूरज कुमार गगन सिंग, पंकज सिंग दिकार सिंग, रोहित अविनाश मिंज यांचा समावेश होता. त्यापैकी सुनील राठोड याला न्यायालयाने (Court) जामीन मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण?

डिसेंबरच्या अखेरीस संशयितांनी सौझा यांच्या रेस्टॉरंटवर शस्त्रे घेऊन हल्ला केला होता. या हल्ल्यात रेस्टॉरंटचे मोठे नुकसान झाले होते. तसेच रेस्टॉरंटमधील तीन कर्मचारी जखमी झाले होते. कळंगुटचे (Calangute) माजी पोलिस निरीक्षक नालास्को रापोझ यांनी हे प्रकरण हाताळण्यात हयगय केल्याप्रकरणी त्यांना तसेच दोन पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भाजपाचे बुराक! गोव्यातील खराब रस्त्यांबाबत 'आप'ने CM प्रमोद सावंतांना पाठवली एक लाख पत्र; अरविंद केजरीवालांचाही सहभाग

रतन टाटांच्या लाडक्यानं वेधलं लक्ष! सेंट फ्रान्सिस ऑफ असिसीच्या चर्चमध्ये ‘गोवा’ची उपस्थिती ठरली भावूक; Watch Video

Viral Video: 15 बायका, 30 मुलं आणि 100 सेवक! राजा 'मस्वाती' शाही लवाजम्यासह अबू धाबी विमानतळावर दाखल; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Abrar Ahmed Controversy: "टीम इंडियाच्या 'त्या' खेळाडूला मारायचंय..."; 'जा जा जा' करणारा पाकिस्तानचा खेळाडू पुन्हा वादात, कोणाला दिली धमकी?

'सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही'; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT