Cyber Fraud Dainik Gomantak
गोवा

केवळ अडीच महिन्यात गोव्यात 14 सायबर गुन्ह्यांची नोंद

2021 मध्ये संपूर्ण वर्षभरात एकूण 24 तक्रारी दाखल, सर्वाधिक गुन्हे फेसबुकवरुन

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा पोलिसांच्या सायबर सेलने जानेवारीपासून अडीच महिन्यात जवळपास 14 तक्रारी दाखल करुन घेतल्या आहेत. गोव्यातही सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याने ही चिंतेची बाब मानली जात आहे. मागच्या संपूर्ण वर्षभरात एकूण 24 तक्रारी दाखल झाल्या होत्या. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये सायबर गुन्हेगारीत कमालीची वाढ झाल्याने सायबर सेलसमोर मोठी आव्हानं उभी ठाकली आहेत.

सायबर गुन्हेगारीत प्रामुख्याने सोशल मीडियाचा (Social Media) वापर झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. बहुतांश गुन्हे हे फेसबुकसारख्या सोशल माध्यमावरुन झाल्याचा निष्कर्षही पोलिसांनी काढला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आधी हे भामटे एखाद्याचं फेसबुकवर बनावट अकाऊंट काढतात आणि संबंधित व्यक्तीला ओळखणाऱ्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. जर ती रिक्वेस्ट समोरच्या वापरकर्त्याने मान्य केली तर त्याला मेसेज पाठवून पैशांची मागणी करतात. पैशांची तातडीची गरज असल्याचं भासवून मागणी केली जाते, आणि या माध्यमातून सोशल मीडियाचा गैरवापर करत लूट केली जाते. याचप्रकारे मागच्याच वर्षी मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं.

दरम्यान फसवणुकीचे (Fraud) सर्वच गुन्हे पोलिसात दाखल केले जात नाहीत. काहीवेळा गुन्हे नोंद न झाल्याने ही संख्या जास्त असू शकते असं पोलिसांचं म्हणणं आहे. शक्यतो लोक या गुन्हेगारांना ऑनलाईन पैसे पाठवतात. त्यांना वाटतं की आपल्या मित्राला पैशांची गरज आहे, मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात येतं. जेव्हा पैसे पोचलेत का विचारण्यासाठी मित्राला फोन केला जातो तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं उघड होतं. यावेळी पोलिसांत जाण्याशिवाय कोणताही पर्याय पीडितांकडे नसतो.

सीम स्वॅपच्या माध्यमातूनही ऑनलाईन घोटाळा केला जातो. यात भामटे एखाद्या दुकानात जातात आणि आपलं सीम हरवल्याचं सांगत तुमच्या नंबरवर एक ओटीपी पाठवतो असं सांगतात. एकदा का नवा ओटीपी मिळाला, की त्यावरुन नवीन सीम कार्ड (Sim Card) घेऊन पैशांची फसवणूक केली जाते, असं पोलिसांचं म्हणणं आहे. यासोबतच फोन कंपनीकडून वापरकर्त्याला माहिती अपडेट न केल्यास 6 तासात सीम ब्लॉक होईल असा मेसेज येतो. यासाठी एक लिंकही पाठवण्यात येते. जेव्हा समोरील व्यक्ती ही माहिती भरुन पाठवते तेव्हा ही माहिती वापरुन हॅकर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करुन लोकांची लूट करतात, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

SCROLL FOR NEXT