<div class="paragraphs"><p>13.62 lakh worth of medicine seized at Giri</p></div>

13.62 lakh worth of medicine seized at Giri

 

Dainik Gomantak

गोवा

गिरी येथे 13,62 लाखांचे अमली पदार्थ जप्त

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (Goa) मोठ्या प्रमाणात पर्यटक (Tourism) आले असल्याने अमली पदार्थांचा व्यवसाय फोफावला आहे. त्यामुळे पोलिसांनीही या विक्रेत्यांविरुद्ध कंबर कसली आहे. पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (Anti-drug squad) काल पहाटे 4 वाजता गिरी येथील पार्किंग क्षेत्रात नायजेरियन अनुलीगवोह कास्मीर चिबुझे (36) याला अटक करून त्याच्याकडून 13.62 लाखांचे कोकेन जप्त केले.

गेल्या काही दिवसांतील पोलिसांनी (Goa Police) केलेली ही मोठी कारवाई आहे. पोलिस निरीक्षक सूरज हळर्णकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थविरोधी पथके शनिवारी रात्री किनारपट्टी (Goa Beach) तसेच इतर भागात गस्तीवर होती. गिरी येथील सेंट डायगोस चर्चजवळच्या पार्किंग क्षेत्रात एक नायजेरियन संशयास्पदरित्या फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे 42.28 ग्रॅम कोकेन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market)त्याची किंमत सुमारे 13.62 लाख रुपये आहे. त्याने हे कोकेन कोठून आणले, त्याची माहिती मिळालेली नाही. तो पर्रा - बार्देश येथे भाड्याच्या खोलीत राहात असल्याने तेथेही तपासणी करण्यात आली. मात्र, तेथे काहीच सापडले नाही.

तस्करीची शक्यता

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळ व नववर्ष स्वागतासाठी (New Year) राज्यात (Goa) मोठ्या प्रमाणात पर्यटक (Tourist) गोव्यात आले असल्याने अमली पदार्थांची तस्करी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हल्लीच पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी गोवा अमली पदार्थमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे विधान केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

पालकांना त्यांच्या मुलांची नावं राहुल गांधी किंवा लालू यादव ठेवण्यापासून कोण रोखू शकेल?: जाणून घ्या SC ने असे म्हटले

SCROLL FOR NEXT