Goa Missing Girl, Goa Girl Kidnapped Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोलीतून अल्पवयीन मुलगी बेपत्ता! अपहरणाचा संशय; पोलिसात तक्रार दाखल

Missing Girl Bicholim: डिचोली परिसरातून एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असून, या मुलीचे अपहरण झाल्याचा संशय आहे. बेपत्ता मुलीच्या पालकांनीही शक्यता व्यक्त करून डिचोली पोलिसात तक्रार केली आहे.

Sameer Panditrao

डिचोली: डिचोली परिसरातून एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असून, या मुलीचे अपहरण झाल्याचा संशय आहे. बेपत्ता मुलीच्या पालकांनीही तशी शक्यता व्यक्त करून डिचोली पोलिसात तक्रार केली आहे.

या तक्रारीला अनुसरून डिचोली पोलिसांनी भारतीय न्याय संस्थेच्या १३७ (२) आणि बाल हक्क कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी डिचोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, डिचोली शहराला टेकून असलेल्या एका गावातून गेल्या रविवारी दुपारपासून ही मुलगी बेपत्ता असल्याचे कळते. बेपत्ता मुलगी ही परप्रांतीय असल्याचे कळते. याप्रकरणी बेपत्ता मुलीच्या पालकाने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

वर्षभरात तीन प्रकरणे

डिचोली परिसरात अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याचे प्रकार वाढले असून, गेल्या वर्षभरात अशा तीन घटना घडल्या आहेत. या तिन्ही प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. चिंताजनक बाब म्हणजे, तिन्ही अपहरण प्रकरणात परप्रांतीयांचा हात असल्याचे उघड झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचेही अपहरण झाल्याचा संशय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

युद्ध सातासमुद्रापार, पण झळा भारताला; कच्च्या तेलाच्या टंचाईने महागाईचा भस्मासुर येणार? - संपादकीय

MS Dhoni: आयपीएलपूर्वी कॅप्टन कूल अडचणीत! धोनीवर रांची पोलिसांची कारवाई! नेमकं प्रकरण काय? वाचा

दक्षिणेत खाण व्यवसाय कधी सुरू होणार? सावर्डे ट्रकमालक संघटनेचा प्रश्‍न; त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

FDA Raid: फोंडा येथील फेरीवाल्यांना नोटिसा, 'एफडीए'ची धडक मोहीम; 80 हून अधिक आस्थापनांची तपासणी

Margao Market: मांजरीची पिल्ले मार्केटमध्ये सोडण्याचा प्रयत्न, दाम्पत्याला पकडले रंगेहाथ; मडगावात केली कारवाई

SCROLL FOR NEXT