Goa News Dainik Gomantak
गोवा

बहिणीच्या छातीवर बुक्की मारली, आमची लायकी काढली; मुंबईतील 13 पर्यटकांना लुथरा बंधुंच्या कल्बमध्ये मारहाण, अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

Mumbai tourists assaulted in Goa: आमची काही चूक नसताना आम्हाला वाईट वागणूक दिली जात होती तरीही त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले, असे महिला पर्यटकाने सांगितले.

Pramod Yadav

`पणजी: हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईट कल्बला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कल्बच्या मालकांना अटक केली असून, या प्रकरणी नवे खुलासे समोर येत असताना. कल्बबाबत आलेले धक्कादायक अनुभव पर्यटकही सांगत आहेत.

याच कल्बमध्ये मुंबईच्या १३ पर्यटकांना मारहाण करण्यात आली व अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. मुंबईच्या वैभवी यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या थरारक प्रसंगाचे कथन केले आहे.

मुंबईच्या वैभवी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गोव्यात घडलेल्या प्रसंगाचे कथन करत कल्बवर विविध आरोप केले आहेत.

"मी ०१ नोव्हेंबर रोजी रोमिओ लेन, वागातोर येथे गेलो होतो. आम्ही १३ जण होतो. कल्बमध्ये गेलो तर आतील वातावरण खूप कोंदट होते, कल्बला एकचा एन्ट्री आणि एक्झीट होती. कल्बमधील कर्मचारी आमच्याशी खूप उद्धटपणे वागत होते. आमची काही चूक नसताना आम्हाला वाईट वागणूक दिली जात होती तरीही त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले."

"आम्हाला सहा आसनी टेबल देण्यात आला. त्याच टेबलशेजारी असलेल्या दुसऱ्या टेबलवर असणारे ग्राहक निघून गेल्यानंतर साहित्य तसेच होते. यावेळी आमच्यासोबत असणारे काहीजण उशीरा आले आणि त्यांनी टेबलवरील ड्रिंक घेऊन एक सीप घेतला. यावरुन येथील कर्मचारी तुम्ही चोर आहात असे म्हणत आमच्याशी बाचाबाची केली", असे वैभवी यांनी सांगितले.

"यानंतर बाहेर जात असताना माझ्या भावाचा एका खुर्चीला पाय लागला यावरुन कल्बमधील बाऊन्सर्स आले आणि आम्हाला मारण्यास सुरुवात केली. आम्ही माफी मागून बाहेर जात होतो तरीही आम्हाला मारहाण करण्यात आली."

"आम्ही तेथून पळालो तर आमचा पाठलाग करण्यात आला. माझ्या बहिणींच्या छातीवर मार बसला. माझ्या भावाला एका बाऊन्सरने लोखंडी रॉडने मारहाण केली, मी ज्यावेळी हे थांबविण्यासाठी गेले असता मलाही बाऊन्सरने मारहाण केली, असा आरोप वैभवी यांनी केला."

"यानंतर खूप गोंधळ झाला. पोलिसांना देखील यावेळी फोन करुन माहिती देण्यात आली. पोलिसांनी हणजूण पोलिस स्थानकात येण्यास सांगितले. पण, अनेकांना जखम झाली होती त्यामुळे दुसऱ्या दिवशी पोलिसांत जाण्याचे आम्ही ठरवले. या कल्बची माहिती काढली त्यावेळी येथे यापूर्वी देखील अशआप्रकारच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले", असे वैभवी म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ST Community Development Fund: एसटींच्या प्रश्नाला उत्तर द्या! 3200 कोटींचा निधी का पोहोचला नाही? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांचा भाजप सरकारला थेट सवाल

Houthi Rebels Attack Saudi Arabia: हौथी बंडखोरांचा सौदी अरेबियावर मोठा प्रतिहल्ला! 'अरामको'चे तेल प्रकल्प क्षेपणास्त्रे अन् ड्रोनने लक्ष्य

Narendra Modi Exam Reform Task Force: विद्यार्थ्यांच्या आक्रोशानंतर मोदी सरकारचे मोठे पाऊल; नंदन नीलेकणी यांच्याकडे 'टास्क फोर्स'ची धुरा

Veeresh Borkar RGP Office Dispute: आरजीपी कार्यालयात अनधिकृत प्रवेशास बंदी! आमदार वीरेश बोरकरांचे नियंत्रण; खोलकर यांच्या गटाने नोंदविला आक्षेप

Goa Farmers Traditional Farming: गोव्यात 17.186 हेक्‍टरवर प्राकृतिक, परंपरागत शेती! राज्‍यातील 9.668 शेतकऱ्यांना मिळाले तब्बल 12.83 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्‍य

SCROLL FOR NEXT