Goa Traffic Cell | Traffic Violations File Photo
गोवा

Goa Traffic Police: 12 टक्‍के अपघात घटले; 2 कोटींचा महसूल झाला जमा

वाहतूक पोलिसांनी कंबर कसून, नियमांची कठोर अंमलबजावणी केलीय

गोमन्तक डिजिटल टीम

जानेवारी महिन्‍यात रस्‍ता अपघात बळींनी प्रशासनाची झोप उडवली होती. त्‍यानंतर वाहतूक पोलिसांनी कंबर कसून, नियमांची कठोर अंमलबजावणी केली. त्‍यामुळे फेब्रुवारी महिन्‍यात अपघात घटले. गत वर्षीच्‍या फेब्रुवारीशी तुलना करता 12 टक्‍के अपघात कमी झाले. सरत्‍या महिन्‍यात चलनाच्‍या स्वरूपात 2 कोटी रुपये जमा झाले.

फेब्रुवारी महिन्‍यात नियमभंग करणाऱ्या 33,434 चालकांना चलने देण्‍यात आली. उत्तर गोव्‍यात 6,592 चलने देण्‍यात आली की जी गेल्‍या वर्षी 4,863 होती. दक्षिण गोव्‍यात 7,771 प्रकरणे नोंद करण्‍यात आली. तेथे गेल्‍या वर्षी 4662 प्रकरणे होती.

आसगाव येथील म्हापसा-शिवोली मार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार एक जण गंभीर जखमी झाला. संजीत दास (२८, रा. मांद्रे व मूळ : बिहार) असे मृताचे नाव असून तो हॉटेलमध्ये कामाला जात होता. तर आलमगीर मलिक (३१, रा. पर्रा) असे जखमीचे नाव आहे.

हॉटेलमध्ये कामाला असलेला संजीत व आलमगीर हे दोघे दुचाकीवरून (जीए ०३ एई ५०९६) म्हापशाच्या दिशेने येत होते. तर रिक्षा टेम्पो (जीए ०७ एफ ६९५५) हा शिवोलीच्या दिशेने जात होता. यावेळी वळणावर हा अपघात समोरासमोर झाला. यात संजीत दास हा जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेला आलमगीर हा गंभीर जखमी झाला. त्याला गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हणजूण पोलिसांनी याची नोंद घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT