Goa Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Theft Case: भाटले-पणजीत 12 लाखांची चोरी; गाझियाबाद, दिल्लीतील दोघांना अटक, सात दिवसांची कोठडी

Goa Theft Case: १२ लाखांचे १५० ग्रॅम सोने पोलिसांनी जप्त केले असून, या दोघांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Theft Case

पणजी पोलिसांनी भाटले-पणजी येथील एका अपार्टमेंटमधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरल्याप्रकरणी संशयित यासीन अली (४५) रा. गाझियाबाद आणि जमील अहमद (४५) रा. दिल्ली या दोघांना बुधवारी अटक केली.

१२ लाखांचे १५० ग्रॅम सोने पोलिसांनी जप्त केले असून, या दोघांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांच्यासह पोलिस उपअधीक्षक सुदेश नाईक आणि पणजीचे पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी गेल्या महिन्यात भाटले येथे झालेल्या चोरीप्रकरणी दोघा चोरट्यांना अटक केल्याची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

कौशल म्हणाले की, बुधवारी गोवा पोलिसांनी गोवा, मुंबई आणि इतर ठिकाणी अनेक चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या दोघा सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवले.

मार्च महिन्यात यासीन अली आणि जमील अहमद या दोघांनी भाटले-पणजी येथील एका अपार्टमेंटचा दरवाजा तोडून कपाटातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती.

पणजी पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपास करून रेल्वेतून दिल्लीला पळून जाणाऱ्या या दोघांचा माग काढला. आरोपीकडून हे दागिने खरेदी करणाऱ्या दिल्लीतील संजय वर्मा या इसमालाही पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ते आमचं बाळ...! कुत्र्याला सोबत नेण्यासाठी हैदराबादच्या जोडप्याने मोजले तब्बल '15 लाख'; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव! ट्रक आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात; चुकीच्या यू-टर्नने घेतला शाळकरी मुलासह 11 जणांचा बळी

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

SCROLL FOR NEXT