12 Goa MLA defection matter adjourned to Feb 1 Dainik Gomantak
गोवा

Goa MLA: 12 आमदार पक्षांतर प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

1 फेब्रुवारीला होणार या प्रकरणाची सुनावणी

दैनिक गोमन्तक

गोवा: काँग्रेसच्या 10 आमदार पक्षांतर प्रकरणाची सुनावणी आज उच्च न्यायालयाने पुन्हा पुढे ढकलली असून, या प्रकरणाची सुनावणी 1 फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे. एमजीपीच्या 2 पक्षांतरित आमदारांविरुद्धच्या याचिकेसह त्यावर सुनावणी होणार आहे. गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी निवडणूक (Goa Election) होणार असल्याने, न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवली की या प्रकरणातील निर्णयाचा प्रतिवादी आमदारांवर परिणाम होणार नाही. (12 Goa MLA defection matter adjourned to Feb 1)

तथापि, न्यायालयाने असे मत व्यक्त केले की, या निकालाचा देशभरात समान प्रकरणांमध्ये उदाहरण ठेवण्याच्या दृष्टीने व्यापक परिणाम होईल. 2019 मध्ये, एकूण 10 काँग्रेस आणि 2 मगोच्या आमदारांनी (MGP) पक्ष सोडून भाजपमध्ये (Goa BJP) प्रवेश केला होता. दोन्ही गटांनी दावा केला होता की त्यांना 2/3 बहुमत आहे आणि म्हणून त्यांचे भाजपमध्ये प्रवेश करणे म्हणजे त्यांचे संबंधित पक्ष भाजपमध्ये विलीन करणे असा आहे.

'पक्षांतर टाळण्यासाठी काँग्रेस आमदारांवर बंधन लादणार'

काँग्रेसला 2017 च्या विधानसभा निवडणुकीत आमदारांच्या पक्षांतरामुळे मोठा फटका बसला होता. मात्र या पक्षांतराचा फटका बसलेल्या काँग्रेसने यावेळी निवडणुकीआधीच त्याचा बंदोबस्त करायचं ठरवलं आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना कायदेशीर मार्गानेच आमदारकी न सोडणे बंधनकारक केलं जाणार आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांवरील निर्बंधांचे स्पष्ट संकेत दिले आहेत, मात्र त्यांनी हे निर्बंध कोणते असतील यावर भाष्य करणं मात्र टाळलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT