Goa Malaria Cases Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: ३७४ मलेरियाचे रुग्‍ण, बार्देश तालुक्‍यात सर्वाधिक; आरोग्‍यमंत्री राणे

Goa Malaria Cases: धारबांदोडा तालुक्यात डेंग्यू, मलेरिया अथवा चिकुनगुनियाचा एकही रुग्ण मागील सहा महिन्यांत आढळला नाही

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात १ जानेवारी ते ३० जून या गेल्‍या सहा महिन्यांत डेंग्यूचे ११७ रुग्‍ण सापडले. तर, परराज्यांतून गोव्यात आलेल्या ३७४ नागरिकांमध्ये मलेरियाचे रुग्‍ण आढळून आले. बार्देश तालुक्‍यात सर्वाधिक रुग्‍ण आढळले, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी विधानसभेत दिली.

मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाला त्‍यांनी लेखी उत्तर दिले आहे. राज्यात मागील सहा महिन्यांत दोन चिकुनगुनियाचे रुग्‍णही आढळल्‍याचे राणे यांनी सांगितले. तेसुद्धा दोन्‍ही बार्देश तालुक्यातच.

मंत्री राणे यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार बार्देश तालुक्यात १०३ डेंग्यूचे तर २३७ मलेरियाचे रुग्ण आढळून आले. उलट धारबांदोडा तालुक्यात डेंग्यू, मलेरिया अथवा चिकुनगुनियाचा एकही रुग्ण मागील सहा महिन्यांत आढळला नाही.

या कारणांमुळे होतो फैलाव

पाणी साठवून ठेवणे, प्लास्‍टिक कप, टायरमध्‍ये पाणी साचून राहिले तर मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होते. त्‍यामुळे डेंग्‍यू, मलेरियाचा धोका वाढतो. तसेच एका नागरिकाचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी जाणे, पर्यटनासाठी तसेच इतर बाबींसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या प्रवासामुळे देखील या आजारांचा फैलाव होतो, असे मंत्री राणे यांनी आपल्‍या उत्तरात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रस्ता सुरक्षेपेक्षा दंडवसुलीला सरकारचे प्राधान्य; 22 ब्लॅकस्पॉटची दुरुस्त कधी? 1,520 मृत्यूंबाबत काँग्रेस सेवा दलाचे सवाल

Thivim Theft: थिवीत वीजतारांवर डल्ला! 83 हजार 437 रुपयांचा मुद्देमाल चोरीला; पश्चिम बंगालमधील 21 वर्षीय संशयिताला अटक

Chikhal Kalo Festival: माशेलचा चिखलकाला; सरकारी राज्योत्सव

Velsao railway track: वेळसावात रेलमार्गावरून तणाव, 'जेसीबी'ने खडी हटविण्याचा प्रयत्न; पोलिसांशी वाद

खरी कुजबूज: मुख्यमंत्री पाठीराखे

SCROLL FOR NEXT