Anjuna Beach Dainik Gomantak
गोवा

Anjuna Beach: हणजूण किनारपट्टीतील 114 आस्थापनांना टाळे

Anjuna Beach: पंचायतीच्या कार्यपद्धतीवर खंडपीठाची नाराजी

दैनिक गोमन्तक

Anjuna Beach:

हणजुणे पंचायतीच्या किनारपट्टीवरील विकास निषिद्ध क्षेत्रातील 175 बेकायदेशीर व्यावसायिक आस्थापनांपैकी 114 आस्थापनांना आज टाळे ठोकण्यात आले. अजून 35आस्थापनांची तपासणी करणे बाकी आहे,

अशी माहिती आज पंचायत सचिवांनी देताच दिलेल्या आदेशानुसार केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे उद्यापर्यंत (6 मार्च) सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले. कारवाई करताना पंचायतीने घेतलेल्या भूमिकेबाबत व कार्यपद्धतीबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

उच्च न्यायालयाने 13 फेब्रुवारी 2024 रोजी हणजूण किनारपट्टीतील विकास निषिद्ध क्षेत्रातील 175 आस्थापनांना टाळे ठोकण्याचा आदेश दिल्याने काही आस्थापनांच्या मालकांनी अर्ज सादर करून या आदेशात सुधारणा करण्याची विनंती केली.

सुमारे 20 आस्थापनांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या न्यायालयाने त्यांच्या विशेष याचिका निकालात काढताना उच्च न्यायालयाकडे अर्ज करून बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. आज उच्च न्यायालयासमोर तीन आस्थापनांनी आदेशात सुधारणा करण्यासाठी

किनारपट्टी क्षेत्रात उभारण्यात आलेली आस्थापने ही तात्पुरती बांधकामे आहेत. त्यामुळे त्यासाठी लागणारा व्यवसाय परवाना व ना हरकत दाखला पंचायतीकडून घेण्यात आलेला आहे. ही पक्की बांधकामे नसल्याने त्यासाठी नगर व शहर नियोजन कायद्यानुसार इमारत नियम लागू होत नाही.

वर्षानुवर्षे या आस्थापनांकडून तात्पुरत्या बांधकामासाठी आवश्‍यक असलेले सर्व परवाने घेऊनच व्यवसाय केला जातो. पंचायतीने उच्च न्यायालयाला दिलेल्या अहवालात परवाने असलेल्या आस्थापनांचाही समावेश केलेला असल्याने त्यांना टाळे ठोकले जाण्याची शक्यता आहे,

अशी बाजू अर्जदारांच्या वकिलांनी केली. ही सुनावणी पूर्ण होऊन पंचायत सचिवांकडून उद्या सादर करण्यात येणाऱ्या अहवालावर खंडपीठाकडून दिलेल्या निर्णयावर या अर्जदारांचे भवितव्य अवलंबून आहे. हणजूण - कायसूव पंचायतीने दिलेल्या अहवालानुसार बेकायदा १७५ आस्थापनांना कारणेदाखवा नोटीस बजावलेल्या आहेत.

त्यामुळे त्यांना टाळे ठोकण्यात यावेत असा आदेश देण्यात आला होता. या आदेशाच्या अंमलबजावणीत पंचायतीकडून चालढकलपणा सुरू आहे. या आदेशाला स्थगिती नसल्याने न्यायालयात अर्ज सादर केलेल्यांविरुद्ध अजूनही कारवाई झालेली नाही.

कारवाईत ढिलाई का?: न्यायालय

काही आस्थापनांच्या धनाढ्य मालकांविरुद्ध पंचायतीकडून कारवाईत का ढिलाई होत आहे असा प्रश्‍न खंडपीठाने पंचायत सचिवांना केला. आत्तापर्यंत ११४ आस्थापनांना टाळे ठोकण्यात आले आहे. ३५ आस्थापनांची तपासणी बाकी आहे. ८ बांधकामे ही आस्थापने नसून ती घरे आहेत त्यामुळे ती वगळण्यात आली आहेत. १८ बांधकामे असलेल्या आस्थापनांनी उच्च न्यायालयात अर्ज सादर करून आदेशाच्या सुधारणेसाठी विनंती केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT