Amit Palekar  Dainik Gomantak
गोवा

Goa Sports: क्रीडा स्पर्धांसाठीचे कंत्राट 110 कोटीला!, अमित पालेकर यांचा आरोप

Goa Sports: गैरव्यवहाराला क्रीडामंत्री जबाबदार

दैनिक गोमन्तक

Goa Sports: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी 92 कोटी रुपयांची बोली लावलेली असतानाही 110 कोटी रुपयांची बोली लावणाऱ्या कंपनीला त्याचे कंत्राट देण्याचे ठरल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांनी ट्विटरवर केला आहे.

अनुभवी आयोजकाने 92 कोटी रुपयांची बोली लावलेली असतानाही त्याला डावलण्यात आल्याबद्दल त्यांनी ट्विटरवर तीन ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यात याला क्रीडामंत्री गोविंद गावडे जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे, की हॉटेल, वाहतूक फ्लीट किंवा खानपानाचा अनुभव नसलेल्या थॉमस कूकपेक्षा अनुभवी बोलीदार अधिक चांगला असताना २० टक्के जास्त दराने निविदा काढण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया हेराफेरी आणि पक्षपाती केली होती.

गोव्यातील क्रीडा सुविधांच्या सुधारणांसाठी हेच पैसे वापरता आले असते. कारण गोमंतकीयांच्या कष्टाने कमावलेल्या कराच्या पैशातून हे केले गेले आहे. कमी अनुभवी कंपनी जास्त किंमतीत का निवडायची हा प्रश्न आहे.पैशाच्या चुराड्याला अधिकारी जबाबदार असतील, असेही पालेकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

Goa Crime: म्हापशात पोलिसांची मोठी कारवाई;2 किलो गांजा जप्त, झारखंडच्या 22 वर्षीय युवकाला अटक

SCROLL FOR NEXT