Jail Dainik Gomantak
गोवा

Pernem Crime: अमली पदार्थ प्रकरणात एकाला 11 वर्षांनंतर सश्रम कारावास

पेडणे येथे बारजवळ पोलिसांनी केली होती कारवाई

दैनिक गोमन्तक

अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणात सिंधुदुर्ग येथील एकाला 11वर्षांनंतर सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. उत्तर गोवा न्यायालयाने सर्व साक्षीदारांचे पुरावे आणि सादर केलेली कागदपत्रे पुरावे ग्राह्य मानत शिक्षा सुनावण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.

( 11 years later, Nikhil Warkhanka gets rigorous imprisonment in drugs case at Pernem )

मिळालेल्या माहितीनुसार 11 फेब्रुवारी 2011 रोजी पेडणे येथे एका बारजवळ सिंधुदुर्गातील एकवीस वर्षीय निखिल वरखणकर याला 870 ग्रॅम चरससह एका संभाव्य ग्राहकाची वाट पाहत असताना पोलिसांनी छापा टाकत ताब्यात घेतले होते.

22 ते 25 वयोगटातील गव्हाळ रंगाचा एक पुरुष जीन्स परिधान केलेले आणि लांब बाह्यांचा शर्ट संभाव्य ग्राहकांना रात्री 9.55 ते रात्री 10.45 दरम्यान अमली पदार्थ वितरीत करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी सेलला मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता.

सापळा रचण्यात आल्यानंतर पोलिसांना संशयित लपत रात्री जीपसह अमली पदार्थासह ग्राहकाची वाट पाहत होता. यावेळी पोलिसांनी कारवाई करत त्याला पकडले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना पेडणे येथे अकरा वर्षांपुर्वी घडली होती. यावर आज उत्तर गोवा न्यायालयाने निखिल वरखणकरला पाच वर्षे सक्तमजुरी आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: कोकणी, मराठी समजल्याशिवाय ग्राहकाला काय हवे हे बँकेतील कर्मचाऱ्याला कसे कळणार?

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Horoscope: गेलेले पैसे परत मिळणार, आर्थिक गणिते सुटणार; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT