'Manipuri Black Rice' लागवडीतुन शेतकऱ्यांना भरघोस नफा

गोव्यात मणिपुरी काळा तांदूळाचा प्रयोग यशस्वी
Manipuri Black Rice
Manipuri Black RiceDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्यातील मडगाव, नावेली या भागात काही शेतकऱ्यांनी प्रसिद्ध 'मणिपुरी काळ्या तांदळाच्या' जातीची यशस्वीपणे लागवड केली आहे. अशा प्रयोगांमुळे शेतकऱ्यांचा नफा वाढत जाईल आणि शेतकऱ्यांना उज्ज्वल भविष्य असेल असे 'मणिपुरी काळ्या तांदळाची' यशस्वी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

(Goan farmers successfully grow high-value Manipuri black rice )

Manipuri Black Rice
Goa Bank: बँक ऑफ महाराष्ट्राच्या निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ!

'मणिपुरी काळ्या तांदळातील अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे ते अत्यंत पौष्टिक मानले जातात, नावेलीमध्ये तांदळाचा पहिला प्रयोग करण्यात आला, हे पीक नुकतेच काढण्यात आले. यावेळी प्रयोगशिल शेतकऱ्यांनी सांगितले की, मणिपुरी काळ्या तांदळाच्या प्रकाराने गोव्याच्या हवामानाशी जुळवून घेतले आहेत, त्यामुळे आम्ही ते येथे वाढवू शकतो, यापुढे यांत्रिक शेतीच्या मदतीने शेतकर्‍यांनी अशा प्रकारे अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणार्‍या उच्च मूल्याच्या तांदळाच्या जाती वाढवणे. हीताचे ठरेल असे ते म्हणाले.

Manipuri Black Rice
Goa News: काणकोणमधील वीज समस्या सोडविणार- सुदिन ढवळीकर

या तांदळाबाबत बोलताना शेतकऱ्यांनी माहिती दिली की, साधारण पांढर्‍या तांदळाची किंमत अंदाजे 70-80 रुपये प्रति किलो आहे आणि लाल तांदूळ 80-90 रुपये प्रति किलो दर आहे, तर मणिपुरी काळा तांदूळ 400 रुपये प्रति किलो या प्रीमियम दराने विकला जातो आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांना नफा मिळू शकतो. शेतकऱ्यांनी याचा विचार करावा.

मिळालेल्या माहितीप्रमाणे या तांदूळाचा प्रथम प्रयोग प्रायोगिकपणे फोंडा, काणकोण आणि म्हापसा येथे कृषी संचालनालयाने गोव्यात योग्यता मोजण्यासाठी केला, त्यानंतर तो नावेली येथील प्लॉटमध्ये केला गेला तो आता यशस्वी झाला आहे.

या तांदुळ प्रयोगावर आपले मत व्यक्त करताना कृषी तज्ज्ञांनी म्हटले आहे की, हा तांदुळ अत्यंत पौष्टिक असला तरी तो दररोज वापरणे शक्य नाही. शिवाय, मक्तेदारी असेल तरच भाव चढेच राहतील. आणखी शेतकरी ते पिकवू लागले की, भाव खाली येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com