500 Cattle Relocation Dainik Gomantak
गोवा

Dhyan Foundation: 11 कोटी अनुदान रखडल्‍याने 500 गुरांवर विस्थापनाची वेळ, स्थलांतरासाठी 'ध्‍यान'ने मागितली परवानगी

500 Cattle Relocation: राज्यातील भटक्या आणि जखमी गुरांचे संगोपन करणाऱ्या ‘ध्यान फाउंडेशन’ने पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालयाकडे ५०० गुरांना कर्नाटकातील हुबळी येथील गोशाळेत हलवण्याची परवानगी मागितली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील भटक्या आणि जखमी गुरांचे संगोपन करणाऱ्या ‘ध्यान फाउंडेशन’ने पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालयाकडे ५०० गुरांना कर्नाटकातील हुबळी येथील गोशाळेत हलवण्याची परवानगी मागितली आहे. तसेच ''ट्रान्सपोर्ट ऑफ ॲनिमल्स रूल्स, १९७८'' च्या नियम ९६ अंतर्गत या गुरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक फिटनेस प्रमाणपत्रे तात्काळ जारी करण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.

२२ ऑगस्ट २०२५ रोजी संस्थेच्या गोवा विभागाच्या समन्वयक स्वाती शिलकर यांनी पशुसंवर्धन संचालकांना पाठवलेल्या पत्रात सरकारच्या कारभारावर प्रश्‍‍न उपस्थित केले आहेत. ध्यान फाउंडेशन १६ डिसेंबर २०१७ पासून गोव्यातील बेतुल, जांबावली आणि शिरवई येथील गोशाळांचे व्यवस्थापन करत आहे.

येथे रस्ते अपघात आणि क्रूरतेतून वाचवलेल्या १३०० भटक्या गुरांची देखभाल केली जाते. भटक्या गुरांच्या व्यवस्थापन योजनेनुसार सरकारकडून प्रति जनावर दररोज १५० रुपये अनुदान मिळणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हा निधी रखडला असून, सध्या ही थकीत रक्कम सुमारे ११.०९ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

पत्रात नमूद केल्यानुसार, पशुसंवर्धन संचालनालयाने २ जून २०२५ रोजी शिरवई गोशाळेसाठी ५८,९२,५०० रुपयांचा निधी मंजूर केला होता. ही रक्कम २० जून २०२५ रोजी केपे नगरपालिकेच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती; परंतु ती अद्याप फाउंडेशनला हस्तांतरित करण्यात आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT