Canacona Karwar highway accident Dainik Gomantak
गोवा

11 गायी ठार; काणकोण - कारवार महामार्गावर पहाटेच्या सुमारास झाला भीषण अपघात

Goa Accident News: पोळे लोलये माजी संरपंच अजित लोलयेकर यांनी गायींच्या अंत्यसंस्कारासाठी जेसीबीची व्यवस्था केली आहे.

Pramod Yadav

काणकोण: मडगाव - कारवार हमरस्त्यावरील पोळे लोलये येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने अकरा गुरांचा बळी गेला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ही भटकी गुरे हमरस्त्यावर रात्रीच्या वेळी कळपाने बसली होती. त्यांना वाहनाने ठोकरल्याने ती जागीच गतप्राण झाली.

ही माहिती पंच अजय लोलयेकर यांना समजताच त्यांनी स्वतःच्या जेसीबीने खड्डे खणून त्यांना पुरले. काणकोणात मोठ्या प्रमाणात चावडी ते माशे या जुन्या हमरस्त्यावर भटकी गुरे रात्रीच्या वेळी बसलेली आढळतात.

त्यामध्ये श्रीस्थळ, पर्तगाळ, पैंगीण व माशे येथे गुरांचे कळप रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आढळतात. त्याचप्रमाणे माशे ते पोळेपर्यंतच्या हमरस्त्यावर शेळी व पोळे येथे रस्त्यावर भटक्या गुरांचे कळप रात्रीच्या वेळी ठाण मांडून बसलेले दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Deported! बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधु बँकॉकमधून डिपोर्ट; दिल्लीतून गोव्यात होणार दाखल, व्हिडिओ आला समोर Watch

अनधिकृत आस्थापन पाडण्याचे आदेश, तरी अंमलबजावणी नाही! 'कारवाई न करण्याचा खेळ' कधी थांबणार?- संपादकीय

विरोधी पक्षांचे नेते 'नर्व्हस' की 'ओवरकॉन्फिडेंट'? स्वार्थासाठी युती तोडली, भाजपला आयती संधी!

Horoscope: नशीब चमकणार! आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार अतिशय शुभ; कारण... आदित्य-मंगल योग

Goa Today News Live: पणजीत मजुरावर प्राणघातक हल्ला, झारखंडच्या संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT