'ना काँग्रेस ना लालू, बिहारमध्ये यापूर्वी असा विकास कधीच झाला नाही'; पुन्हा NDA जिंकणार प्रमोद सावंत यांचा विश्वास

Bihar Assembly Election 2025: राहुल गांधी निवडणुकीत पराजीत होतात त्यावेळी त्यांना मतचोरी दिसते, त्यांना कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये मतचोरी दिसत नाही; CM सावंत
Pramod Sawant on Bihar development
Pramod SawantPramod Sawant X Handle
Published on
Updated on

पणजी: "बिहारमध्ये एनडीए सरकारने केलेला विकास यापूर्वी कधीच झाला नाही. ना काँग्रेस ना लालू यांच्या काळात विकास झाला. कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा उत्साह पाहता बिहारमध्ये पुन्हा एनडीए सरकार येईल", असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पटना आणि बांकीपूर येथे आयोजित भाजप कार्यकर्ता संमेलनात सहभाग नोंदवत कर्याकर्त्यांना संबोधित केले. यावेळी केंद्रीय मंत्री शांडील्य गिरीराज सिंग, बिहारचे मंत्री नितीन नबीन, खासदार संजय जैस्वाल आणि इतर नेत्यांनी हजेरी लावली होती. बिहारमधील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री सावंत रात्रीच पटनामध्ये दाखल झाले होते.

Pramod Sawant on Bihar development
सात दिवसांत मास्टरमाईंडचे नाव समोर न आल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार; मंत्री तवडकरांच्या नावाने व्हायरल होतोय फेक मेसेज

कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता राज्यात एनडीए सरकार येत आहे. एनडीएने जो विकास केलाय तो यापूर्वी कधीच झाला नाही. ना काँग्रेस ना लालू. यामुळे बिहारची जनता एनडीए बहुमताने विजयी करेल. युवक आणि महिलांना मोदींशिवाय विकास होऊ शकणार नाही हे समजलंय, त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीए विजयी होईल", असा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

Pramod Sawant on Bihar development
11 गायी ठार; काणकोण - कारवार महामार्गावर पहाटेच्या सुमारास झाला भीषण अपघात

मतचोरीच्या आरोपावर बोलताना प्रमोद सावंत यांनी राहुल गांधीवर टीका केली. राहुल गांधी निवडणुकीत पराजीत होतात त्यावेळी त्यांना मतचोरी दिसते, त्यांना कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये मतचोरी दिसत नाही. घुसखोरांच्या मतांवर ते मतचोरीचा विषय मांडत आहेत, पण असा काही विषय येथे नसल्याचे प्रमोद सावंत म्हणाले. तसेच, बिहारमध्ये ज्या पद्धतीचा विकास झालाय त्याच आधारावर लोक मतदान करतील, असेही सावंत यावेळी म्हणाले.

"काँग्रेस आणि लालू यादव यांचा फक्त परिवारवाद सुरु आहे तर, एनडीए विकासासाठी काम करत आहे. नोट चारी आणि चारा चोरीचा आरोप असलेल्या लोकांना जनतेने अनुभव घेतला आहे. सध्याचे सरकार युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या तत्वावर काम करत आहे", असे सावंत कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com