Anganwadi Open in Sattari Dainik Gomantak
गोवा

सत्तरीतील 108 अंगणवाड्या सुरू

चिमुकल्यांचा किलबिलाट; तब्बल दोन वर्षानंतर मुलांचे जल्लोषात स्वागत

दैनिक गोमन्तक

वाळपई : राज्यातील अंगणवाड्यांच्या शैक्षणिक वर्षाला शुक्रवार 1 जुलैपासून सुरुवात झाली. सत्तरी तालुक्यातील एकूण 108 अंगणवाड्या चिमुकल्यांनी गजबजल्या. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे अंगणवाड्या मुलांसाठी बंद होत्या. सरकारने कोरोनाचा प्रदूभाव पाहता सर्व अंगणवाड्या सुरू करण्यास मान्यता दिली. त्यानुसार आजपासून सर्व अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या.

सत्तरीतील वाळपई नगरपालिका क्षेत्रातील तसेच इतर पंचायत क्षेत्रातील सर्व अंगणवाड्या मुलांनी भरल्या होत्या. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. प्रवेश द्वारावर मुलांचे स्वागत करण्यासाठी फुगे लावून सुंदररित्या सजविण्यात आले होते. तसेच मुलांचे औक्षण करून त्यांना भेट देऊन त्यांना आत प्रवेश देण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते.

वाळपई नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. 2, अंगणवाडी सेंटर 12 च्या पालक ज्योती झर्मेकर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाड्या बंद होत्या. त्यामुळे मुलांना घरीच राहावे लागते. तो काळ आमच्यासाठी खूप कठीण होता. कारण मुलांचा सर्वांगीण विकास हा अंगणवाडीतच होत असतो. अंगणवाडीच्या माध्यमातून मुले पुढील शिक्षण घेतात. त्यामुळे मुलांचे खूप नुकसान झाले आहे. आता अंगणवाड्या पुन्हा सुरू झाल्यामुळे समाधान व आनंद व्यक्त होत आहे.

मंत्री विश्वजित राणे यांनी सत्तरीतून डिजिटायझेशनला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे अंगणवाड्या सुरू झाल्यानंतर त्यासंदर्भातील प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. कोपार्डे सत्तरी येथील अंगणवाडी शिक्षिका निशा सावंत म्हणाल्या, जवळपास गेल्या दोन वर्षानंतर आज मुलांचे अंगणवाडीत स्वागत करताना एक प्रकारचा आनंद होत आहे. मुले अंगणवाडी शिवाय ओसाड पडली होती. आमचे अस्तित्व हे मुलांमुळे आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोनासारख्या परिस्थितीचा परिणाम मुलांवर येणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.

अंगणवाड्यांना मिळणार इमारत
सत्तरीत अनेक अंगणवाड्या भाड्याच्या जागेत सुरू आहेत. काही ठिकाणी स्वतंत्र इमारती बांधून अंगणवाडी चालतात. यंदापासून महिला व बालविकास खात्यातर्फे तालुक्यातील अंगणवाड्यांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून त्यांना टॅब देण्यात येणार आहेत. ज्या अंगणवाडी भाड्याच्या खोलीत सुरू आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र इमारती बांधण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेक ठिकाणी याविषयीचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्या- नंतर या शाळा स्वतंत्र इमारतीत सुरू होतील, अशी माहिती महिला व बालविकास खात्याकडून उपलब्ध झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT