Mega Mutation Camp Margao Dainik Gomantak
गोवा

Margao News: ६८५ फाईल्सचे पुनरावलोकन, ९४ प्रकरणे प्रमाणित; ‘मेगा म्युटेशन’मधून १०० पेक्षा जास्त प्रकरणे निकाली

Mega Mutation Camp Margao: मडगावातील जिल्हा प्रशासनाच्या मामलेदार कार्यालयात आयोजित केलेल्या मेगा म्युटेशन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मडगावातील जिल्हा प्रशासनाच्या मामलेदार कार्यालयात शनिवार, २८ रोजी आयोजित केलेल्या मेगा म्युटेशन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी १० वाजता सुरू झालेले हे शिबिर सायंकाळी ५ वाजता संपले व त्यात शेकडो लोकांनी त्यांच्या वकिलांमार्फत १०० पेक्षा जास्त प्रकरणे निकालात काढली.

सकाळच्या सत्रातील दोन तासांत ४५ प्रकरणे निकालात काढण्यात आली होती. आज दिवसभरात ६८५ फाईल्सचे पुनरावलोकन करण्यात आले. ९४ प्रकरणे प्रमाणित करण्यात आली तर ५८१ डुप्लिकेट फाईल्स नाकारण्यात आल्या, अशी माहिती देण्यात आली.

यासंदर्भात बोलताना मामलेदार प्रतापराव गावकर यांनी सांगितले की, या मेगा म्युटेशन शिबिराला लोकांचा व वकिलांचा चांगला प्रतिसाद लाभला. हे शिबिर दक्षिण गोवा वकील संघटनेच्या विनंतीवरून घेण्यात आले. सर्व पाचही मामलेदार कार्यालयांत अनेक प्रकरणे निकालात काढण्यात आली. जर गरज भासली तर अशाप्रकारची आणखी शिबिरे घेतली जातील.

तालुकावार शिबिरे घेण्याची मागणी

केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी सांगितले की, ही एक चांगली संकल्पना आहे. ज्या प्रकरणांमध्ये कसलाही घोळ नाही किंवा कौटुंबिक वाद नाही, ती प्रकरणे आज निकालात काढण्यात आली आहेत. आपण मामलेदार कचेरी व सरकारचे आभार मानतो. त्याचप्रमाणे अशाप्रकारची शिबिरे प्रत्येक तालुक्यात आयोजित करावीत.

म्युटेशनची जवळजवळ १२०० प्रकरणे प्रलंबित होती. त्यामुळे अशा शिबिराची आवश्यकता होती. काही प्रकरणे दुप्पट असल्याने त्यांचा आकडा वाढलेला आहे. अशी १५० दुप्पट प्रकरणे आम्हाला सापडली आहेत. अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमुळे ही प्रकरणे प्रलंबित आहेत. काही लोक कागदपत्रांमध्ये झालेली गफलत बरोबर करून घेण्यासाठीही आले होते. -
प्रतापराव गावकर, मामलेदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

Ruturaj Gaikwad Century: ऋतुराज गायकवाडचं वादळ! गोव्याविरुद्ध झळकावलं शानदार शतक; बनला 'विजय हजारे ट्रॉफी'चा नवा 'सेंच्युरी किंग'

झारखंड दारु घोटाळा! छत्तीसगडच्या मद्य व्यावसायिक नवीन केडियाला गोव्यातून अटक; ACB ची कारवाई

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

SCROLL FOR NEXT