Coal Pollution: कोळसा दुर्गंधीचा विषय चिघळला! आमदार आमोणकर, अदानीच्या अधिकाऱ्यांमध्ये गरमागरम चर्चा Watch Video

Sankalp Amonkar: बंदरातील कोळसा दुर्गंधीमुळे सडा, बोगदा, जेटी व इतर रहिवासी त्रस्त झाले आहेत. या विरोधात आमोणकर यांनी शेकडो रहिवाशांसह ११ फेब्रुवारीला अदानी कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता.
Mormugao coal pollution issue
Mormugao coal pollution issueDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: कोळसा दुर्गंधी व प्रदूषण रोखण्यासाठी यापूर्वी काय केले, तसेच भविष्यात कोणती सुधारणा करणार, यासंबंधीची माहिती २४ तासांत लेखी स्वरूपात देण्याची मागणी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केली होती. ही मागणी मुरगाव बंदरात कोळसा हाताळणी करणाऱ्या अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. मात्र, ही समस्या सुटेपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा आमोणकर यांनी दिला.

बंदरातील कोळसा दुर्गंधीमुळे सडा, बोगदा, जेटी व इतर परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. या विरोधात आमोणकर यांनी शेकडो रहिवाशांसह ११ फेब्रुवारीला अदानी कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता. त्यावेळी तीन दिवसांमध्ये दुर्गंधी बंद न झाल्यास कायदा हाती घेण्याचा इशाराही दिला होता.

तीन दिवसांनंतर दुर्गंधी कमी झाली. मात्र, सोमवारपासून पुन्हा दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे आमोणकर यांच्यासह नागरिकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी अदानी कंपनीच्या कार्यालयात जाऊन कंपनीचे मुख्य अधिकारी संदीप आणि भूषण यांच्याशी चर्चा केली. यावेळी गरमागरम चर्चा झाली. आमोणकर यांनी कंपनीच्या एकूण भूमिकेविषयी तीव्र संताप व्यक्त केला.

Mormugao coal pollution issue
Coal Transport: मुरगाव बंदरातून कोळसा वाहतूक वाढणार! होस्पेट ते बेळ्ळारीदरम्यान आणखी 2 लोहमार्गांना मंजुरी

दुर्गंधी कायमस्वरूपी बंद करावी. हा कोळसा लोकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याने इंडोनेशियातील दगडी कोळशाची आयात येथे करू नये, असे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका श्रद्धा आमोणकर, रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, प्रसाद प्रभुगावकर, मुरगाव मतदारसंघाचे प्रभारी संतोष केरकर, शांताराम पराडकर, रवळनाथ पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाईक, सांतान आदी उपस्थित होते.

Mormugao coal pollution issue
Coal Handling: मुरगाव बंदरातून कोळसा हाताळणीत वाढ! मालवाहतुकही 25 टक्क्यांनी वधारली; दक्षिण-पश्चिम रेल्वेची सरस कामगिरी

रेलगाड्या मिळत नसल्याने कोळसा पडून

यावेळी कंपनीचे अधिकारी संदीप यांनी कोळसा आयात बंद करण्यासंबंधी कोणताही निर्णय घेऊ शकत नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कंपनीतर्फे कोणत्या उपाययोजना केल्या, यासंबंधी माहिती दिली. तसेच उपाययोजनांमुळे दुर्गधी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. कोळसा वाहतूक करण्यासाठी रेलगाड्या मिळत नसल्याने काहीवेळा कोळसा पडून राहतो. ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com