100 electric buses will come to Kadamba Dainik Gomantak
गोवा

‘कदंब’कडे येणार आणखी 100 इलेक्ट्रीक बस

प्रदूषणावर नियंत्रण आणत राज्यांतर्गत वाहतुकीसाठी कदंब महामंडळाने इलेक्ट्रीक बसेस खरेदीचा सपाटा चालविला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कदंबा वाहतूक महामंडळाने(Kadamba Transport) आणखी 100 इलेक्ट्रीकल बस खरेदीसाठी हैदराबादच्या एका कंपनीला निविदा दिली आहे. त्यासाठी सुमारे 140 कोटींचे अनुदान निश्‍चित करण्यात आले आहे. यापूर्वी, कदंबाने 35 इलेक्ट्रीक बस खरेदी केल्या आहेत.

प्रदूषणावर नियंत्रण आणत राज्यांतर्गत वाहतुकीसाठी कदंब महामंडळाने इलेक्ट्रीक बसेस KTC) खरेदीचा सपाटा चालविला आहे. पुन्हा 100 बस खरेदी केली जाणार असून येत्या वर्षभरात या बसेस कदंबच्या ताफ्यात दाखल होतील. 9 मीटर लांबीच्या या बसगाड्या वातानुकूलीत असतील.

35 प्रवाशांची आसन व्यवस्था असणाऱ्या या बसमध्ये सीसीटीन्ही कॅमेरा, आपत्कालीन बटण, युएसबी सॉकेट अशा अत्याधुनिक सोयी आहेत. एकदा चार्जिंग केल्यानंतर ही बस 200 कि.मी. धावू शकते, असा दावा संबंधित कंपनीने केला आहे. यापूर्वी कदंबने 35 गाड्या खरेदी केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT