Rent A Vehicles Dainik Gomantak
गोवा

Goa Police: अवैधपणे ‘रेंट ए बाईक’, कार दिलेल्यांची 10 वाहने जप्त

Goa Police: पोलिस अधीक्षक अक्षत कौशल: मोहीम पुढेही सुरू राहणार

दैनिक गोमन्तक

Goa Police: राज्यभरात वाहतूक पोलिसांनी बेकायदेशीरपणे भाडेपट्टीवर दुचाकी व चारचाकी देणाऱ्या मालकांविरुद्ध धडक मोहीम सुरू करून 10 मालकांविरुद्ध कारवाई केली आहे. त्यांची वाहने जप्त करून पुढील कारवाईसाठी त्याचा अहवाल न्यायालयाला पाठवण्यात येणार आहे. ही मोहीम पुढील काही दिवस सुरूच राहिल,अशी माहिती वाहतूक पोलिस विभागाचे अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

खासगी दुचाकी व चारचाकी पर्यटकांना भाडेपट्टीवर देणाऱ्या वाहन मालकांविरुद्ध कारवाई सुरू केल्याची माहिती मिळताच अनेकांनी भाडेपट्टीवर वाहने देणे बंद केले आहे. पणजीतील काही भागात खासगी दुचाकी घेऊन फिरणाऱ्या पर्यटकांना थांबवून वाहनांची तपासणी वाहतूक पोलिसांनी केली.

ही वाहने भाडेपट्टीवर घेlल्याची माहिती पर्यटकांनी दिल्यावर ती ताब्यात घेण्यात आली. मात्र, या कारवाईमुळे पर्यटकांना अडचणींना सामोरे जावे लागू म्हणून त्यांना पर्यायी ‘रेंट ए बाईक’ वा ‘रेंट ए कार’ ही परवाना असलेली वाहने घेण्याच्या सूचना केल्या. वाहतूक पोलिसांकडून सतावणूक होत असल्याच्या तक्रारी पर्यटकांकडून वारंवार होत असतात त्यामुळे ही कारवाई करताना सावधगिरी बाळगली आहे,असे कौशल यांनी सांगितले.

वाहतूक पोलिसांनी ही विशेष मोहीम सुरू केल्यापासून खासगी वाहने भाडेपट्टीवर देऊन बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांची धाबे दणाणले आहे. काहींनी ‘रेंट ए बाईक’ व ‘रेंट ए कार’ याचा परवाना वाहतूक खात्याकडून घेऊन हा व्यवसाय सुरू केला आहे. प्रत्येकाला पाच दुचाकी या व्यवसायात गुंतविता येतात. त्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्यांनी आणखी दुचाकी वाहने खरेदी करून त्याचा बेकायदेशीर वापर करत आहेत. काहींजण परवाना असलेली क्रमांकपट्टी खासगी वाहनांना लावून ती वापरत आहेत, अशीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे संशयास्पद वाहनांचीही तपासणी केली जाईल,अशी माहिती एका वाहतूक अधिकाऱ्याने दिली.

यावर्षी आतापर्यंत 225 अपघाती मृत्यू

यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत सुमारे 225 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे त्यामध्ये अधिक तर दुचाकीस्वारांचा समावेश आहे. निष्काळजीपणे व भरधाववेगाने दुचाकी चालविल्याने काही पर्यटकांनाही जीवाला मुकावे लागले आहे. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’प्रकरणी गेल्या दहा महिन्यात १ हजारपेक्षा अधिकजणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दोनवेळा हा गुन्हा नोंद झालेल्या चालकांचा परवाना निलंबित करण्यासाठी वाहतूक खात्याकडे शिफारस करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नवी कोरी गाडी घातली समुद्रात! सुरक्षारक्षकाच्या सूचनांकडे दुर्लक्ष, हणजूण किनाऱ्यावर पर्यटकाची फजिती; Watch Video

Tillari Accident: ..तिलारीची सहल ठरली अखेरची! ताबा सुटल्याने टेम्पो-दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Goa Shipyard: सांकवाळ येथील जमीन मिळणार गोवा शिपयार्डला, 81 कोटींना मंजुरी; सरकारला बसणार 34 कोटींचा फटका

Mhaji Bus: 'म्हजी बसमुळे अपघात - वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल', CM सावंताचे प्रतिपादन; 4 इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण

Chorla Ghat: चोर्लाघाट ठरतोय ‘मृत्‍यूचा सापळा’! ठिसूळ झाडे, दरडी; प्रवाशांचा जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT