CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: राज्यात 10 प्रकल्पांना मंजुरी, तर 3 हजाराहून अधिक रोजगारसंधी

मुख्यमंत्री: 347 कोटींची गुंतवणूक शक्य

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) राज्यातील नव्या 10 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमध्ये 347 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून यातून 3 हजार 495 रोजगारसंधी उपलब्ध होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या आजच्या 33 व्या बैठकीत वेर्णा, कुंडई, काकोडा येथे नवीन प्रकल्पाच्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील 10 प्रकल्पांपैकी 4 युनिट्स हे सध्याच्या युनिट्समध्ये उत्पादन क्षमतेचा विस्तार करत आहेत.

3 युनिट्स नवीन असून गोव्यातील उत्पादक कंपन्यांनी प्रस्तावित केले आहेत. संरक्षण क्षेत्र, औषध निर्मिती, अन्न चाचणी प्रयोगशाळा, हॉस्पिटलिटी क्षेत्रातील हे विस्तारित प्रकल्प आहेत.

फार्मास्युटिकल उद्योगांना वाव; मोठ्या प्रमाणात रोजगार

वेर्णा, कुंडई येथे फार्मास्युटिकल उद्योगांना बराच वाव आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे.

जमीन उद्योजकांच्या ताब्यात दिल्यानंतर एक ते दीड वर्षात उद्योग सुरू करून त्यांनी नोकऱ्या बहाल करणे अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या 33 व्या बैठकीत 348 कोटींचे 10 उद्योग मंजूर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

तीन ते चार उद्योगांना जागा द्यावी लागणार आहे. उर्वरित उद्योगांची स्वतःची जागा आहे, असे ते म्हणाले.

असे आहेत मंजूर प्रकल्प

1 मे. ग्वाला क्लोझर प्रा.लि- पॅकेजिंग निर्मिती क्षेत्रातील ही कंपनी डिचोली तालुक्यातील हरवळे येथे उभारण्यात येत आहे. यात २४.९९ कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून या प्रकल्पामध्ये ४९३ रोजगार संधी निर्माण होतील.

2 इंडिका सायंटिफिक- ही ग्रीन कॅटेगरीतील कंपनी असून अन्न आणि औषध चाचणी क्षेत्रातील आहे. वेर्णा औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या प्रकल्पात ५ कोटी रुपये पर्यंतची गुंतवणूक होणे अपेक्षित असून ७० पेक्षा जास्त रोजगार संधी निर्माण होतील.

3 ट्युलिप डायग्नोस्टिक प्रायव्हेट लि.- ही कंपनी वेर्णा औद्योगिक वसाहतीत येत असून यात २.७७ कोटी रुपये गुंतवणूक होणार आहे. यात ४९ रोजगार संधी निर्माण होतील.

४ ट्युलिप डायग्नोस्टिक प्रायव्हेट लि.- ही कंपनी वेर्णा औद्योगिक वसाहतीत येत असून ६६०० चौ. मी. वर उभारली जाणार आहे. यात ३६ कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून १८० रोजगार संधी उपलब्ध होतील. प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रांसाठी लागणारी उपकरणे अँटीसेप्टिक, आरटीपीसीआर टेस्ट किट आणि इतर वैद्यकीय वस्तूंची निर्मिती यात होणार आहे.

५ ट्युलिप डायग्नोस्टिक प्रायव्हेट लि. हा कंपनीचा विस्तार असून वैद्यकीय क्षेत्रातील वस्तूंची निर्मिती करण्याच्या या फॅक्टरीमध्ये ८.९२ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून १७९ रोजगार संधी निर्माण होतील.

६ मेसर्स इम्पेरियल डिस्टलरी - प्रामुख्याने रेड कॅटेगरीतील या प्रकल्पात ४८.८० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून ४४७ रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. प्रामुख्याने मद्य निर्मितीचा हा प्रकल्प आहे.

7 पावरलँड ऍग्रो ट्रॅक्टर व्हीकल्स - हे गोव्यातील स्टार्टअप बेस प्रकल्प वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये अस्तित्वात असला तरी नव्या प्रकल्पासाठी आयडीसी जागा देईल. प्रामुख्याने २० हजार चौ. मी.वर उभारल्या जात असलेल्या या प्रकल्पामध्ये ५० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून ९९८ रोजगार संधी निर्माण होतील.

8 मेसेर्स द लाटेराईट रिसॉर्ट- ग्रीन कॅटेगरीतील हा प्रकल्प हॉस्पिटलिटी विभागातील असून तिसवाडी तालुक्यातील येला येथे उभारला जाणार आहे. यात १५.७४ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून ३३५ रोजगार संधी निर्माण होतील.

9 इनक्यूब इथिकल्स प्रा. लि.- प्रामुख्याने वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणारे औषधे निर्माण करणारा हा प्रकल्प मडकई औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात येत आहे. ऑरेंज कॅटेगरीतील या प्रकल्पात १५० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून ४२६ रोजगार संधी उपलब्ध होतील.

10 बासेफ्स हा प्रकल्प केपे तालुक्यातील काकोडा औद्योगिक वसाहतीमध्ये विस्तारित प्रकल्प म्हणून येत असून आहे. यात ५.७१ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून ३१८ रोजगार संधी निर्माण होतील. यात साऊंड सिस्टम तयार केले जातील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT