illegal huts demolished in bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

Illegal Huts Demolished: कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पिराचीकोंड येथे मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: मागील काही वर्षांपासून वाद सुरू असलेल्या शहरातील 'पिराचीकोंड' येथील बेकायदा झोपडपट्टीवर अखेर कारवाई करताना ही झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार आज प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने डिचोली पालिकेने ही कारवाई केली.

जेसीबी यंत्राच्या सहकार्याने झोपडपट्टी मोडण्यात आली. बेकायदेशीरपणे उभारलेल्या दहा झोपड्या मोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

जेसीबीसह पालिकेचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी पिराचीकोंड येथील झोपडपट्टीजवळ येताच तेथील लोकांमध्ये खळबळ माजली. पिराचीकोंड येथे वातावरणही तप्त झाले होते. जमीनमालक आणि झोपडवासीयांमधील दोन गटांत वादही होताना एका युवकावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

मामलेदारांच्या देखरेखीखाली कारवाई

झोपडपट्टी मोडतेवेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पिराचीकोंड येथे मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कारवाईवेळी डिचोली पालिकेचे अधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिचोलीचे मामलेदार प्रवीण गावस परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

मामलेदार श्री. गावस यांनी झोपडवासियांची समजूत काढून झोपड्या खाली करण्याचे आदेश झोपडपट्टीवासियांना दिले. मात्र जवळपास दोन तास प्रतीक्षा करुनही झोपडपट्टीवासियांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर दुपारी झोपडपट्टी विरोधात कारवाई करण्याचे आदेश मामलेदारांनी दिले.

झोपडपट्टी मोडण्यास विरोध

पिराचीकोंड येथील झोपडपट्टीचा वाद न्यायप्रविष्ठ होता. ही झोपडपट्टी बेकायदा असल्याचा दावा करून झोपडपट्टी विरोधात उच्च न्यायालयात खटला चालू होता. ही झोपडपट्टी मोडण्याचे आदेश न्यायालयाने देताच आज (20 सप्टेंबर) सकाळी जेसीबी यंत्रासह पालिकेची यंत्रणा पिराचीकोंड येथे दाखल झाली.

मात्र, झोपडपट्टीवासीयांनी झोपड्या खाली करण्यास नकार दिला. झोपड्या खाली करण्यासंबंधी आम्हाला आगाऊ कल्पना दिली नसल्याचे संबंधीत झोपडपट्टीवासीयांचे म्हणणे होते, तर झोपडपट्टी मोडण्यात येणार असल्याची कल्पना देऊन झोपड्या खाली करण्यास संबंधीत झोपडपट्टीवासीयांना कळविले होते. असा पालिकेचा दावा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT