CM Pramod Sawant
CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Government Jobs : गोव्यात सरकारी नोकरभरतीत मोठे बदल; मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Government Jobs : गोव्यात सरकारी नोकरभरतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तशी घोषणाच केली आहे. सरकारी नोकरीसाठीच्या नियमांमध्ये गेल्या 30 वर्षांत बदल झालेला नव्हता. मात्र आता गोव्यात सरकारी नोकरी मिळवायची असेल तर एक वर्षाचा अनुभव सक्तीचा करण्यात आला आहे.

तसंत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापुढे सर्व सरकारी पदं आयोगामार्फत भरण्याचं सूतोवाच केलं आहे. गोव्यात नोकरी मिळवायची असेल तर एक चुकीचा समज आहे, की आपला आमदार किंवा मंत्री नोकरी मिळवून देईल. मात्र यापुढे गोव्यात असं काहीही होणार नाही. त्यामुळे नोकरीसाठी आमदार किंवा मंत्र्यांच्या भेटी घेणं बंद करा असा सल्ला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. गोव्यात यापुढे सर्व सरकारी पदं ही स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत भरली जातील त्यामुळे ज्यांना नोकरी हवी असेल त्यांनी या आयोगामार्फतच अर्ज करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

राज्य सरकारच्या रोजगार आणि कामगार मंत्रालयातर्फे जाहीर केलेल्या मेगा जॉब फेअरमध्ये 15 हजार जणांनी नोंदणी केली आहे. 155 कंपन्यांतील जवळपास 5 हजार जागांसाठी आज मंगळवारी आणि 9 रोजी बुधवारी एकूण 4 स्लॉटमध्ये ही भरती प्रक्रिया होईल, अशी माहिती रोजगार आणि कामगार आयुक्त राजू गावस यांनी दिली आहे.

बेरोजगारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी एका छताखाली ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर 155 कंपन्यांना एकत्र बोलवून ही भरती प्रक्रिया होणार आहे. संख्या जास्त असल्याने गैरसोय टाळण्यासाठी ही नोकरभरती प्रक्रियेचा एक दिवस वाढवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT