Heart Attack Survival Dainik Gomantak
गोवा

Goa Health: एक वर्षाच्या चिमुकल्याला हृदयविकाराच्या झटक्यातून वाचवण्यात यश! पणजीच्या रुग्णवाहिका पथकाने दाखवले प्रसंगसावधान

CCA Panji Ambulance Team: सीसीए पणजी रुग्णवाहिका पथकाने दाखवलेल्या प्रसंगासावधानामुळे या चिमुकलीला हृदयविकाराच्या झटक्यांपासून वाचवण्यात यश आले.

Manish Jadhav

पणजी: पणजीतील सीसीए रुग्णवाहिका पथकाने एका 1 वर्ष 3 महिन्यांच्या बालकाचा प्राण वाचवत आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये असलेल्या समर्पणाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. या मुलाला अचानक अकडी (seizures) आणि हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आला. मात्र, इएमटी-ए वैशाली वेर्णेकर आणि चालक अब्दुल शेख यांनी तात्काळ उपचार करत इंट्युबेशन आणि व्हेंटिलेटर सपोर्ट देऊन गोवा वैद्यकीय महाविद्यालयात चिमुकल्याला सुरक्षितपणे दाखल केले.

तातडीच्या मदतीमुळे चिमुकल्याचे प्राण वाचले

दरम्यान, या आरोग्य सेवकांनी तातडीने दिलेल्या मदतीमुळे चिमुकल्याचे प्राण वाचले आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. या कठीण परिस्थितीत त्यांनी दाखवलेली तत्परता, कौशल्य आणि संवेदनशीलता यासाठी त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. आपत्कालीन वैद्यकीय सेवा ही आरोग्य व्यवस्थेची अत्यंत महत्त्वाची बाजू असून अशा समर्पित कर्मचाऱ्यांमुळेच ती अधिक प्रभावी ठरते, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी म्हटले.

आरोग्यमंत्र्यांनी कौतुक केले

या जीवनरक्षक सेवेसाठी इएमटी- ए वैशाली वेर्णेकर आणि चालक अब्दुल शेख यांचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मनःपूर्वक आभार मानले. अशा समर्पित आरोग्य सेवकांमुळे आपली आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

SCROLL FOR NEXT