Manohar Dhond Memorial State Chief Ranking Badminton Tournament  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Badminton Tournament: मनोहर धोंड बॅडमिंटन स्पर्धेत यास्मिनला दुहेरी किताब; अव्वल मानांकित राहुल पुरुष एकेरीत विजेता

Manohar Dhond Badminton Tournament: मनोहर धोंड स्मृती राज्य प्रमुख मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत यास्मिन सय्यद हिने दुहेरी किताब पटकावला. याशिवाय राहुल देसवाल, आरोही कौटणकर, फॉईड अरावजो, फ्रेड्रिक फर्नांडिस, आर्यमान सराफ, सिन्नोव्हिया डिसोझा यांनीही विजेतेपदास गवसणी घातली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मनोहर धोंड स्मृती राज्य प्रमुख मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत यास्मिन सय्यद हिने दुहेरी किताब पटकावला. याशिवाय राहुल देसवाल, आरोही कौटणकर, फॉईड अरावजो, फ्रेड्रिक फर्नांडिस, आर्यमान सराफ, सिन्नोव्हिया डिसोझा यांनीही विजेतेपदास गवसणी घातली.

धोंड स्पोर्टस क्लब, इव्हनिंग बॅडमिंटन ग्रुप, पणजी क्रीडा संकुल यांनी संयुक्तपणे घेतलेली स्पर्धा कांपाल येथील इनडोअर स्टेडियममध्ये झाली.

अव्वल मानांकित राहुल पुरुष एकेरीत विजेता ठरला. अंतिम लढतीत त्याने निशांत शेणई याच्यावर २१-१७, २१-९ अशी मात केली. महिला एकेरीत बाजी मारताना आरोही हिने चुरशीच्या लढतीत अव्वल मानांकित सुफिया शेख हिला १९-२१, २१-१८, २१-१९ असे हरविले.

पुरुष दुहेरीत फ्लॉईड व फ्रेडरिक जोडीने विजेतेपद मिळविताना आर्यमान सराफ व सूरज लामा जोडीस २१-१८, १०-२१, २१-१८ असे हरविले. महिलांच्या दुहेरीत यास्मिन हिने सिन्नाव्हिया हिच्या साथीत अव्वल मानांकित शिवांजली थिटे व सुफिया शेख जोडीस २१-१३, २४-२२ असे नमविले. मिश्र दुहेरीत यास्मिन हिने आर्यमान सराफ याच्यासमवेत अंतिम लढत जिंकली. या जोडीने राहुल देसवाल व मलायका लोबो जोडीस २१-१९, २१-१३ असे पराभूत केले.

कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, धोंड स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष हर्षद धोंड, माजी क्रिकेटपटू अंबे पर्वतकर, गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील, सचिव प्रवीण शेणॉय, खजिनदार संजय भोबे, आयोजन सचिव संदीप हेबळे, मुख्य रेफरी विनायक कामत, नरहर ठाकूर, दिनेश पै, नवनीत नास्नोडकर यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT