BCCI Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

BCCI Election: बीबीसीआयच्या निवडणुकीत गोवा क्रिकेट असोसिएशनचा मतदार असणार का? शनिवारी होणार निर्णय

BCCI Election Latest Update: शुक्रवारी जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक झाली. तेव्हा पाच सदस्यांनी दाखल केलेला रोहन गावस देसाई यांच्या प्रतिनिधी नियुक्तीचा ठराव मंजूर झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीबीसीआय) २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत गोवा क्रिकेट असोसिएशनला (जीसीए) मतदार या नात्याने प्रतिनिधित्व असेल की नाही, याबाबत बीबीसीआय निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बीबीसीआय मतदार याची शनिवारी (१३ सप्टेंबर) सायंकाळी ६ वाजता जाहीर होईल.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार, शुक्रवारी जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक झाली. तेव्हा पाच सदस्यांनी दाखल केलेला रोहन गावस देसाई यांच्या प्रतिनिधी नियुक्तीचा ठराव मंजूर झाला.

तर जीसीए सचिव शंभा नाईक देसाई यांनी अध्यक्ष विपुल फडके यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत मुदतीच्या कालावधीत जीसीए आपल्या प्रतिनिधीचे नाव बीबीसीआय निवडणूक अधिकाकाऱ्यांना पाठवू शकले नव्हते.

यासंदर्भात जीसीएने प्रतिनिधीचे नाव पाठवण्यास असमर्थ असल्याचा इमेल निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवला. प्राप्त माहितीनुसार, रोहन गावस देसाई यांच्या समर्थक गटाने कायदेशीर सल्ल्यानंतर रोहन देसाई यांचे नाव सुचवणाऱ्या ठरावाची माहिती बीसीसीआय निवडणूक अधिकाऱ्याला इमेलद्वारे पाठवली.

आता या दोन परस्परविरोधी पत्रव्यवहारांमुळे आज संध्याकाळपर्यंत निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात, याबाबत सर्वांना उत्कंठा लागून राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चिंबलमध्ये जनआंदोलन भडकले! निसर्ग रक्षणासाठी लढा; युनिटी मॉल, प्रशासन स्तंभ प्रकल्पाला विरोध

Chandra Gochar 2025: चंद्रदेवाची शतभिषा नक्षत्रात एन्ट्री! 'या' 3 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; नोकरीतील पदोन्नतीसह व्यवसायात होणार भरभराट

Goa Accident: शिवोली-मार्णा मार्गावर अपघाताचा थरार! चिरेवाहू ट्रकने दोन गाड्यांना उडवले, सुदैवाने जीवितहानी टळली

माणुसकीला काळिमा! गाईच्या पोटातून निघाला 48 किलो प्लास्टिकचा डोंगर; वाळपईत 'रेकॉर्ड ब्रेक' शस्त्रक्रिया

Viral Video: 'मी नाही तर कोणीच नाही!' बॅटिंग मिळाली नाही म्हणून पठ्ठ्यानं अख्खं क्रिकेट ग्राऊंडच नांगरलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT