virat kohli and rohit sharma Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Virat Kohli: रोहित खेळणार, पण विराट नाही! 'या' स्पर्धेत सहभागी होण्यास किंग कोहलीचा नकार, रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Vijay Hazare Trophy 2025: विराट कोहलीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) समोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Manish Jadhav

Vijay Hazare Trophy 2025: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेची सुरुवात धमाकेदार शतकी खेळीने केली. या मालिकेतील दुसरा सामना 3 डिसेंबर रोजी होणार आहे. याचदरम्यान, विराटसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, 24 डिसेंबर 2024 पासून सुरु होणाऱ्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय विराटने घेतला. यापूर्वी, विराट 16 वर्षांनंतर या स्पर्धेत पुनरागमन करु शकतो आणि काही सामने खेळताना दिसू शकतो, असा दावा केला जात होता.

विराट कोहलीचा मोठा निर्णय, BCCI समोर आव्हान

विराट कोहलीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) समोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. एका रिपोर्टनुसार, विराटचा विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होण्याचा कोणताही विचार नाही. विशेष म्हणजे, ही स्पर्धा सर्व भारतीय खेळाडूंसाठी खेळणे अनिवार्य मानली जाते. BCCI ची इच्छा आहे की, संघाचे महत्त्वाचे खेळाडू असलेल्या रोहित शर्मा आणि विराटने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी व्हावे. मात्र, विराट या भूमिकेत दिसत नाही.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, रोहित शर्माने (Rohit Sharma) मात्र या स्पर्धेत सहभागी होण्यास होकार दिला आहे. यामुळे विराटला एकट्याला कोणतीही विशेष सूट देणे BCCI साठी अधिक अवघड झाले आहे. एनडीटीव्हीला एका सूत्राने सांगितले की, "मुद्दा विजय हजारे ट्रॉफीचा आहे. कोहलीला खेळायचेच नाही. जेव्हा रोहितदेखील खेळत आहे, तेव्हा एकाच खेळाडूसाठी सूट कशी दिली जाऊ शकते? आणि आम्ही इतर खेळाडूंना काय सांगणार? तो खेळाडू तुमच्या सर्वांपेक्षा वेगळा आहे का?" कोहलीच्या या निर्णयामुळे निवड समिती आणि BCCI व्यवस्थापनाला इतर खेळाडूंसाठी नियम लागू करताना मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

सोळा वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटपासून दूर

विराटने आपला शेवटचा विजय हजारे ट्रॉफीचा सामना 16 वर्षांपूर्वी म्हणजे 2010 मध्ये खेळला होता. विराटने 2008 ते 2010 या कालावधीत दिल्ली संघाकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये 13 सामने खेळले आणि एकूण 819 धावा केल्या, ज्यात 4 शतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमधील या स्पर्धेतून तो दूर असला तरी, त्याने गेल्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये मात्र पुनरागमन केले आणि दिल्ली संघासाठी एक सामना खेळला. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले महत्त्व सिद्ध केलेल्या विराटने देशांतर्गत क्रिकेटपासून इतकी वर्षे दूर राहणे, आणि अनिवार्य स्पर्धेत खेळण्यास नकार देणे, हा निर्णय सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election Result: जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'! विरोधकांची युती न झाल्यानं फुललं कमळ; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Goa ZP Election Results: 'म्हजे घर' योजनेचा करिश्मा! भाजप-मगो युतीचा जिल्हा पंचायतीत ऐतिहासिक विजय; CM सावंतांनी मानले जनतेचे आभार

Gold-Silver Prices: सोन्या-चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ! लग्नसराईत ग्राहकांना घाम; एका दिवसात चांदीच्या दरात 'इतक्या' हजारांची वाढ

Team India: वर्ल्ड कप टीम जाहीर होताच टीम इंडियाला बसला मोठा धक्का; 'या' स्टार खेळाडूनं तडकाफडकी घेतली निवृत्ती!

Swiggy Instamart Report: ना चिकन, ना पनीर... या ग्राहकाने फक्त 'कंडोम'वर खर्च केले लाखो रुपये; स्विगी इन्स्टामार्टचा थक्क करणारा रिपोर्ट!

SCROLL FOR NEXT