Vinoo Mankad Trophy U-19  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vinoo Mankad Trophy: गोव्याचा चार सामन्यांतील तिसरा पराभव; दिशांकची एकहाती झुंज, हैदराबाद विजयी

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मध्यफळीतील प्रतिभाशाली युवा फलंदाज दिशांक मिस्कीनने जबरदस्त झुंज दिली, पण ती एकहाती ठरल्यामुळे गोव्याला १९ वर्षांखालील विनू मांकड करंडक एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजयासाठी पुरेशी ठरली नाही. दुसऱ्या टोकावरील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे दिशांकची ८७ धावांनी जिगरबाज खेळी निष्फळ ठरली आणि हैदराबादने सामना ३१ धावांनी जिंकला.

गोवा व हैदराबाद यांच्यातील सामना गुरुवारी मल्लानपूर-मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम संकुलात झाला. गोव्यासमोर विजयासाठी २४९ धावांचे आव्हान होते. लक्ष्याचा पाठलाग करताना एका बाजूने दिशांक दमदार फलंदाजी करत असतानाही गोव्याने दुसऱ्या टोकास सहा फलंदाज ४० धावांत गमावले. ९ बाद १८४ अशी स्थिती असताना गोव्याचा पराभव स्पष्ट होता, तरीही दिशांकने खिंड लढविताना शेवटचा गडी शिवेन बोरकर (नाबाद ६) याच्यासमवेत प्रयत्न केले. अखेरीस दिशांक वैयक्तिक शतकाला १३ धावा हव्या असताना बाद झाला आणि गोव्याचा डाव २१७ धावांत संपुष्टात आला. दिशांक व शिवेनने अखेरच्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. त्यापूर्वी, दिशांकने धावबाद झालेला सलामीचा फलंदाज आदित्य कोटा (४०) याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली होती.

गोव्याचा हा ‘फ’ गटातील चार सामन्यांतील तिसरा पराभव ठरला. अखेरची लढत आता १२ ऑक्टोबर रोजी चंडीगडविरुद्ध होईल. गोव्याने स्पर्धेत फक्त एक सामना जिंकला आहे.

युवा फलंदाजांचे सातत्य

दिशांकने या स्पर्धेत सातत्य राखले आहे. त्याने गुरुवारी यावेळच्या स्पर्धेतील वैयक्तिक दुसरे अर्धशतक केले. त्याने ९८ चेंडूंत १० चौकारांसह ८७ धावा केल्या. यापूर्वी त्याने हिमाचल प्रदेशविरुद्ध ५६ धावांची खेळी केली होती, तर नागालँडविरुद्ध शतक (१०४) ठोकले होते. स्पर्धेतील चार डावांत त्याने आतापर्यंत ६६.५च्या सरासरीने २६६ धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Secunderabad Vasco-Da-Gama Express: गोव्याला जाण्यासाठी आणखी एक एक्सप्रेस सुरु; जाणून घ्या वेळापत्रक

Subhas Velingkar Controversy: गोमंतकीयांना 'शांतता' हवी! ‘गोंयकार’पण म्हणजे काय, हे समजून घेणे अतिशय गरजेचे

Rent Bike In Goa: आम्हालाही ‘रेंट बाईक’चा परवाना द्या! खासगी दुचाकीधारकांची मागणी

FC GOA साठी आनंदाची बातमी! 'हे' दोन खेळाडू तंदुरुस्त; पुढचा सामना मुंबई सिटीविरुद्ध

Maryam Nawaz: ''प्लीज मदत करा...''; जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी मरियम नवाझ यांची भारताला हाक!

SCROLL FOR NEXT