Former Cricketer Vinod Kambli  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vinod Kambli: सचिनचा 'जिगरी यार' विनोद कांबळीला पेंशन मिळते का?

Former Cricketer Vinod Kambli Pension: एकेकाळी करोडोंची कमाई करणाऱ्या कांबळी याच्याकडे आता फक्त बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनचं उत्पन्न आहे. विनोदला बीसीसीआयकडून दरमहा 30 हजार रुपये पेन्शन मिळते.

Manish Jadhav

what is vinod kambli net worth and pension

पुणे : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा रमाकांत आचरे यांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंचावर विनोद कांबळी येताच सचिन तेंडुलकर आपल्या बालपणीच्या मित्राला भेटायला गेले.

सचिन यांनी आपल्या जुन्या मित्राचा हात हातात घेवून आपुलकीने विचारपूस केली. हे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आणि कठीण काळातही मित्र कधीच विसरत नाही, असे कॅप्शन देत या भेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

विनोद कांबळी- सचिन तेंडुलकर कधीपासून मित्र आहेत?

विनोद आणि सचिन यांच्या मैत्रीची सुरुवात झाली ते वर्ष होतं 1983. विनोद कांबळी 11 वर्षांचा असावा आणि सचिन यांचं वय असेल 10. दोघेही शारदाश्रम शाळेतले विद्यार्थी. रमाकांत आचरेकर हे क्रिकेटचे कोच होते. एखादा विद्यार्थी खेळात चांगला नसेल तर आचरेकर हे सडेतोड मत मांडायचे आणि यामुळे विद्यार्थी त्यांना थोडे घाबरुन असायचे. आचरेकर सरांनी नकार दिला की, त्या विद्यार्थ्याला वर्गात येऊन अभ्यास करावा लागेल हे सर्वांना माहिती होते.

विनोद कांबळीने एका लेखात सचिनचा किस्सा सांगितला होता. विनोद लिहितो, “शारदाश्रमसाठी खेळाडूंची निवड सुरु होती. सरावादरम्यान मी चांगला खेळत होतो. पण सचिन दडपणाखाली होता. ते हवेत फटकेबाजी करत होता. आचेरकरसरांनी नकार दिला.

शेवटी सचिनचा मोठा भाऊ अजितने सरांशी चर्चा केली. त्यांना सचिनला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी मनवले. दुसऱ्या दिवशी सरांनी सचिनला पुन्हा संधी, पण तो सचिन वेगळा होता. त्याचा आत्मविश्वास परतला होता, त्याच्यासारखी फटकेबाजी कधीही पाहिली नव्हती.”

हॅरिस शिल्ड स्पर्धेत 664 धावांची भागीदारी

शारदाश्रम विद्यामंदिर शाळेच्या हॅरिस शिल्ड स्पर्धेत सचिन आणि विनोद जोडीने मोठी कामगिरी केली होती. या स्पर्धेत झेवियर स्कूलविरुद्ध खेळताना त्यांनी 664 धावांचा शानदार रेकॉर्ड केला होता.

विनोदचं करिअर लवकर संपुष्टात का आले?

खरंतर विनोद आणि सचिन या जोडीने मुंबई क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला होता. एकीकडे सचिन मैदानात दमदार कामगिरी करायचा, यश मिळत असतानाच त्याने सरावात कधी खंड पडू दिला नाही.

दुसरीकडे, विनोद मैदानात चांगली खेळी करायचा, पण मैदानाबाहेर त्याचे स्वत: नियंत्रण नव्हते. तो संध्याकाळी मित्रांसोबत पार्टी करायचा. मैदानात तुम्हाला चांगली कामगिरी करायची असेल तर तुम्हाला रात्री चांगली झोप, फिटनेस याकडेही लक्ष द्यावे लागते. विनोद इथंच चुकला, असे अजित वाडेकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

विनोद कांबळीचे आर्थिक उत्पन्न किती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकेकाळी करोडोंची कमाई करणाऱ्या कांबळी याच्याकडे आता फक्त बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनचं उत्पन्न आहे. विनोदला बीसीसीआयकडून (BCCI) दरमहा 30 हजार रुपये पेन्शन मिळते. 2022 पर्यंत विनोदचे वार्षिक उत्पन्न केवळ 4 लाख रुपये होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कांबळी कॉमेंट्री आणि जाहिरातींमधून चांगली कमाई करत होता. 2022 मधील एका रिपोर्टनुसार, त्याची एकूण संपत्ती तेव्हा दीड मिलियन डॉलर होती.

दुसरीकडे, त्याचाच जिवलग मित्र असणाऱ्या सचिनकडे करोडोची संपत्ती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती 1110 कोटी एवढी आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बीसीसीआय सचिनला दरमहा 50 हजार रुपये पेन्शन म्हणून देते. तसेच, सचिनचे मुंबई आणि बंगळुरुमध्ये दोन रेस्टॉरंट आहेत. सचिन एका महिन्यात 4 कोटींहून अधिक आणि वार्षिक 50 कोटींहून अधिक कमावतो.

104 वनडे, 17 कसोटी सामने खेळले

विनोद कांबळीने भारतासाठी एकूण 104 एकदिवसीय सामने आणि 17 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने भारतासाठी (India) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 3,561 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये कसोटीमध्ये चार शतके आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतकांचा समावेश आहे. विनोद कांबळीने 1991 मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण केले होते, तर 2000 मध्ये त्याने शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT