Goa Cricket Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vijay Merchant Trophy: टीमच्या 168 धावा, त्यात सलामीवीराचे शतक! गोव्याच्या 'अदीप'ची झंझावाती खेळी; आंध्रची सामन्यावर मजबूत पकड

Goa Vs Chattisgarh: छत्तीसगडमधील भिलाई येथे सुरू असलेल्या एलिट ड गट सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवसअखेर आंध्रने पकड मजबूत करताना १ बाद २४४ धावा करून पहिल्या डावात ७६ धावांची आघाडी संपादली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: विजय मर्चंट करंडक १६ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याचा पहिला डाव १६८ धावांत संपुष्टात आला, त्यात सलामीच्या अदीप मिस्कीन याने झंझावाती शतक ठोकताना १०९ धावांचे योगदान दिले. बाकी फलंदाजी मात्र अपयशी ठरले.

छत्तीसगडमधील भिलाई येथे सुरू असलेल्या एलिट ड गट सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवसअखेर आंध्रने पकड मजबूत करताना १ बाद २४४ धावा करून पहिल्या डावात ७६ धावांची आघाडी संपादली. गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण अदीपच्या घणाघाती फलंदाजीव्यतिरिक्त इतरांनी निराशा केली.

अदीपने १०८ चेंडूंतील खेळीत १०९ धावा करताना १८ चौकार व तीन षटकार खेचले. त्याने आशुतोष शेट्टी (११) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. आंध्रच्या पहिल्या डावात केएनव्ही कौशिक ११४, तर टी. हर्ष साई सात्विक ९७ धावांवर नाबाद आहे. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी १९१ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ४२.२ षटकांत सर्वबाद १६८ (अदीप मिस्कीन १०९, जेडन परेरा १, साईराज गोवेकर ६, विनीत कामत २१, महंमद उझैर २, शौनक तेली ०, आशुतोष शेट्टी ११, मृणाल नाईक ०, रिश पावसकर ५, सारंग गोवेकर नाबाद ०, संकल्प नाईक ७, के. गौतम आर्या ७-४३).

आंध्र, पहिला डाव ः ४३ षटकांत १ बाद २४४ (केएनव्ही कौशिक नाबाद ११४, हर्ष साई सात्विक नाबाद ९७, सारंग गोवेकर ९-०-६८-०, विनीत कामत १०-०-४८-०, रिश पावसकर ४-०-१७-०, मृणाल नाईक ११-०-६६-१, संकल्प नाईक ६-०-२२-०, शौनक तेली २-०-१७-०, आशुतोष शेट्टी १-०-४-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजप-मगोप युती विरोधकांना क्लिन स्वीप करेल, राज्यात यापुढे तिहेरी इंजिन कार्यरत होईल'! CM सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Amulya Vessel: भारतीय तटरक्षक दलाच्या ‘अमूल्य’चे जलावतरण! किनारपट्टींची सुरक्षा होणार मजबूत, Watch Video

Goa Winter: धुक्यात हरवला गोवा! हुडहुडी वाढली; पुढचे 2 दिवस कसे राहणार हवामान? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; मेस्सी गोव्यात आला असता तर !

Manik Elephant: 'माणिक हत्ती' 1200 किमी प्रवास करून 'वनतारा'त जाऊ शकेल का? गोवा खंडपीठाचे शारीरिक क्षमता तपासण्याचे आदेश Video

SCROLL FOR NEXT