पणजी: फलंदाजी आणि गोलंदाजीत अतिशय कमजोर कामगिरी प्रदर्शित केलेला गोव्याचा १६ वर्षांखालील मुलांचा क्रिकेट संघ सलग पाचव्या पराभवासह मंगळवारी घरी येण्यास रवाना झाला.
विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ‘ड’ गट सामन्यात अवघ्या दुसऱ्याच दिवशी कर्नाटकने त्यांच्यावर डाव व १४७ धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला व बोनससह सात गुणांची कमाई केली. तीन दिवसीय सामना छत्तीसगडमधील रायपूर येथे झाला.
गोव्याने पहिल्या डावात १६० धावा केल्यानंतर कर्नाटकने पहिला डाव ६ बाद ४३४ धावांवर घोषित करून २७४ धावांची आघाडी संपादली. गोव्याचा दुसरा डाव १२७ धावांत गारद झाला. कर्नाटकच्या सुविक गिल याने दोन्ही डावांत मिळून ११ गडी (५-३२ व ६-५५) बाद केले.
गोवा, पहिला डाव ः १६० व दुसरा डाव ः ३९ षटकांत सर्वबाद १२७ (अदीप मिस्कीन २७, महंमद उझैर १५, विनीत कामत २०, शौनक तेली २३, अर्णव नाईक १२, सुविक गिल ६-५५, जे. सुकृत २-२३) पराभूत वि. कर्नाटक, पहिला डाव ः ७६ षटकांत ६ बाद ४३४ घोषित (निरंजन अशोक १३०, आर. रोहित रेड्डी १०४, स्यामंतक अनिरुद्ध ८२, हर्ष नैन १५-१-८७-१, विनीत कामत ८-०-४९-०, प्रथम प्रभुगावकर ३-०-१८-०, मृणाल नाईक २०-०-१३०-३, अर्णव नाईक १-०-१५-०, शौनक तेली १८-१-६०-१, अनुराग बहादूर ५-०-४०-१).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.