Cricket  X
गोंयचें खेळामळ

Vijay Merchant Trophy: फॉलोऑन टाळण्यात गोव्याला यश! आफ्रिदचे झुंजार अर्धशतक, शमिक-मोहितची चिवट भागीदारी

Vijay Merchant Cricket Trophy 2024: अर्धशतक केलेला आफ्रिद साब याच्यासह फलंदाजांनी जोरदार झुंज दिल्यामुळे १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याच्या संघ बंगालविरुद्ध फॉलोऑन टाळण्यात सफल ठरला.

गोमन्तक डिजिटल टीम

Vijay Merchant Cricket Trophy 2024 Goa Vs Bengal

पणजी: अर्धशतक केलेला आफ्रिद साब याच्यासह फलंदाजांनी जोरदार झुंज दिल्यामुळे १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याच्या संघ बंगालविरुद्ध फॉलोऑन टाळण्यात सफल ठरला. तीन दिवसीय सामना गुजरातमधील सूरत येथील सी. के. पिठावाला क्रिकेट मैदानावर सुरू आहे.

गोव्याचे वेगवान गोलंदाज कर्णधार शमिक कामत (४-५२) व शिवम सिंग (३-४१) यांनी पहिल्या दिवसअखेरच्या ७ बाद ३०५ वरून बंगालचा पहिला डाव गुरुवारी सकाळी ३२१ धावांत गुंडाळला. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर गोव्याने पहिल्या डावात ८ बाद १८० धावा केल्या होत्या, ते अजून १४३ धावांनी मागे आहेत.

आफ्रिदने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक करताना १५७ चेंडूंत १३ चौकार व एका षटकारासह ७३ धावा केल्या. फॉलोऑन टाळण्यासाठी ३३ धावांची गरज आणि तीन विकेट बाकी असताना कर्णधार शमिक कामत (१६) व मोहित यादव (नाबाद ३१) यांनी खिंड लढविल्यामुळे गोव्यावरील नामुष्की टळली.

संक्षिप्त धावफलक

बंगाल, पहिला डाव (७ बाद ३०५ वरून) ः ९७ षटकांत सर्वबाद ३२१ (सचिन यादव १०३, पापाई बाराई २३, शमिक कामत १६-२-५२-४, शिवम सिंग १४-२-४१-३). गोवा, पहिला डाव ः ८२ षटकांत ८ बाद १८० (सर्वांभ नाईक १९, बरहान दाश ४, साईराज गोवेकर ६, आफ्रिद साब ७३, विनीत कामत ०, साई नाईक २१, शमिक कामत १६, मोहित यादव नाबाद ३१, अरमान नदाफ ०, शिवम सिंग नाबाद ०, अगस्त्य शुक्ला १५-१०-१५-२, आकाश तरफदार २१-८-४२-६).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahavatar Narasimha: महावतार नरसिंहचा दमदार जलवा! 17 दिवसांत 213 कोटींचा टप्पा; 'छावा'च्या यादीत झाला समावेश

Comunidade Land Bill: '..अन्यथा न्यायालयात जाऊ'! कोमुनिदाद विधेयक बेकायदेशीर असल्याचा दावा; संघटनांचा विरोध

Goa Crime: तलवार-लाठ्यांनी हल्ला, नंतर गाडीवर गोळीबार; गोव्यात भल्या पहाटे तरुणांवर प्राणघातक हल्ला

Goa Live News: पासिंग-आउट परेडला मुख्यमंत्री आसाममध्ये

Goa NABARD Loan: ‘नाबार्ड’कडून गोव्याने घेतले 1368 कोटींचे कर्ज! लोकसभेत झाला खुलासा; सीतारामन यांनी केली आकडेवारी सादर

SCROLL FOR NEXT