Goa Cricket|Karnataka Tour Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vijay Hazare Trophy: उत्तराखंडविरुद्ध गोव्याचा दारुण पराभव! 92 धावांत संघ गारद; अमूल्यला वगळल्यामुळे प्रश्नचिन्ह

Goa Vs Uttarakhand: विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडने गोव्याचा डाव ९२ धावांत गुंडाळून सामना आठ विकेट आणि तब्बल १८७ चेंडू राखून सहज जिंकला.

Sameer Panditrao

Vijay Hazare Trophy Goa Vs Uttarakhand

पणजी: विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडने गोव्याचा डाव ९२ धावांत गुंडाळून सामना आठ विकेट आणि तब्बल १८७ चेंडू राखून सहज जिंकला. अ गटातील सामना शनिवारी जयपूर येथील के. एल. सैनी स्टेडियमवर झाला. गोव्याचा हा चार सामन्यांतील दुसरा पराभव ठरला, तर तेवढेच सामने खेळलेल्या उत्तराखंडने दुसऱ्या विजयाची नोंद केली.

डावखुरा फिरकी गोलंदाज कर्णधार दर्शन मिसाळ तंदुरुस्त ठरल्यामुळे तो उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यासाठी संघात परतला. त्यामुळे मणिपूरविरुद्ध मागील लढतीत २० धावांत ५ गडी टिपलेला डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्य पांड्रेकर याला संघात जागा मिळू शकली नाही. यापूर्वी, १९ नोव्हेंबर २०२२ रोजी विजय हजारे करंडक सामन्यात अमूल्यने अरुणाचल प्रदेशविरुद्ध ४१ धावांत ५ गडी बाद केले होते, त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते आणि तब्बल दोन वर्षे गोव्याच्या संघात जागा मिळाली नव्हती. उत्तराखंडविरुद्ध डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर तंदुरुस्तीच्या समस्येमुळे खेळू शकला नाही.

संक्षिप्त धावफलक

गोवा ः २९ षटकांत सर्वबाद ९२ (स्नेहल कवठणकर ०, ईशान गडेकर १, के. व्ही. सिद्धार्थ १, ऋत्विक नाईक ८, सुयश प्रभुदेसाई ३५, दीपराज गावकर ७, दर्शन मिसाळ ०, विकास सिंग २०, मोहित रेडकर १, शुभम तारी ६, विजेश प्रभुदेसाई नाबाद २, दीपक धापोला ९-१-१९-३, अभय नेगी ८-०-३२-२, प्रशांत भाटी ७-०-२०-३) पराभूत वि. उत्तराखंड ः १८.५ षटकांत २ बाद ९७ (आर. समर्थ २६, कुणाल चंडेला नाबाद ३८, शाश्वत डांगवाल नाबाद २२, ऋत्विक नाईक ६-०-२६-०, शुभम तारी ८-१-३०-१, विजेश प्रभुदेसाई २.५-०-२७-०, दीपराज गावकर २-०-८-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT