Vijay Hazare Trophy Goa Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vijay Hazare Trophy: शुभमची संघात वापसी, कर्णधारपदाची धुरा दीपराजच्या खांद्यावर; एकदिवसीय स्पर्धेसाठी गोव्याचा संघ जाहीर

Vijay Hazare Trophy Goa Team: अष्टपैलू दीपराज गावकर याच्याकडे आगामी विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेत गोव्याचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अष्टपैलू दीपराज गावकर याच्याकडे आगामी विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेत गोव्याचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट संघातील तिघांना जयपूर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी स्थान मिळालेले नाही.

ऑफस्पिनर मोहित रेडकर, सलामीचा ईशान गडेकर, तसेच मध्यमगती फेलिक्स आलेमाव हे तिघेेही ‘लिस्ट ए व्हाईट बॉल’ क्रिकेट संघातून बाहेर गेले आहेत. त्यांच्याऐवजी सलामीचा डावखुरा अझान महंमद थोटा, ऑफस्पिनर शुभम देसाई व नवोदित वेगवान गोलंदाज समीत आर्यन मिश्रा यांनी निवड झाली आहे.

२३ वर्षीय अझान डिसेंबर २०२४ मध्ये गोव्यातर्फे सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत तीन सामने खेळला होता. गतमोसमात तो २३ वर्षांखालील स्पर्धेत धावांच्या बाबतीत गोव्याचा सफल फलंदाज ठरला होता. शुभम २०१९ नंतर एकदिवसीय संघात परतला आहे. अखेरच्या वेळेस तो जानेवारी २०२३ मध्ये गोव्याकडून रणजी सामना खेळला होता.

समीत याने २३ वर्षांखालील वयोगटापर्यंत गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. वगळण्यात आलेला मोहित नुकत्याच झालेल्या टी-२० स्पर्धेतील दोन सामन्यांत खेळला होता. एकंदरीत त्याने तीन षटके गोलंदाजी टाकताना ५६ धावा मोजल्या होत्या, त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.

ईशान याने याच स्पर्धेत चार सामन्यांत ८.७५च्या सरासरीने फक्त ३५ धावा केल्या होत्या. फेलिक्स एकही सामना खेळला नव्हता. टी-२० स्पर्धेत सुयश प्रभुदेसाई गोव्याचा कर्णधार होता, तो आता एकदिवसीय स्पर्धेत खेळाडू या नात्याने खेळेल. रणजी संघ कर्णधार स्नेहल कवठणकर एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आहे. स्पर्धेसाठी १६ सदस्यीय संघ निवडण्यात आला आहे.

मोहीम २४ डिसेंबरपासून

गोव्याची विजय हजारे करंडक लिस्ट ए क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटातील मोहीम २४ डिसेंबरपासून सुरू होईल. सामने जयपूर येथे खेळले जातील. पहिला सामना छत्तीसगडविरुद्ध होईल. त्यानंतर अनुक्रमे हिमाचल प्रदेश (२६ डिसेंबर), सिक्कीम (२९ डिसेंबर), मुंबई (३१ डिसेंबर), उत्तराखंड (३ जानेवारी), पंजाब (६ जानेवारी) व महाराष्ट्र (८ जानेवारी) या संघांविरुद्ध गोव्याचा संघ खेळेल. गतमोसमातील (२०२४-२५) एकदिवसीय स्पर्धेत गोव्याने सात सामन्यांत तीन विजय व चार पराभव अशी कामगिरी साधली होती.

गोव्याचा संघ असा

दीपराज गावकर (कर्णधार), स्नेहल कवठणकर (उपकर्णधार), अझान महंमद थोटा, कश्यप बखले, अभिनव तेजराणा, सुयश प्रभुदेसाई, ललित यादव, दर्शन मिसाळ, राजशेखर हरिकांत, अर्जुन तेंडुलकर, वासुकी कौशिक, शुभम तारी, अमूल्य पांड्रेकर, विकास सिंग, शुभम देसाई, समीत आर्यन मिश्रा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Mass Shooting: दक्षिण आफ्रिकेत रक्ताचा सडा...! 3 चिमुरड्यांसह 11 जणांचा मृत्यू; जोहान्सबर्गमध्ये अज्ञातांकडून अंधाधुंद फायरिंग

Goa Shack Fire: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट'ला भीषण आग! पर्यटकांच्या लाडक्या शॅकचे मोठे नुकसान

छत्रपतींच्या आदेशानुसार बाजीराव पेशव्यांनी सरदार रामचंद्र सुखटणकर यांच्या सूचनेवरून 'मंगेशी' गाव मंदिराला दान केले..

Goa Salt Pans: 1964 साली गोव्यात 200 हून अधिक मिठागरे होती आणि आज..?

Goa Live News: बिबट्याच्या हल्ल्यात निवृत्त बँक अधिकारी जखमी

SCROLL FOR NEXT