Vaibhav Suryavanshi Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीचा अनोखा पराक्रम! आता इंग्लंडमध्ये गोलंदाजीतही रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Vaibhav Suryavanshi Record: इंग्लंड अंडर-19 संघाविरुद्धच्या यूथ टेस्ट मॅचमध्ये त्याने केवळ 1 विकेट घेऊन एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Manish Jadhav

Vaibhav Suryavanshi Record: आयपीएल 2025 मध्ये आपल्या वादळी फलंदाजीने इतिहास घडवल्यानंतर युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या भूमीवरही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. फलंदाजीतील पराक्रमानंतर आता वैभवने गोलंदाजीतही इतिहास रचला आहे. इंग्लंड अंडर-19 संघाविरुद्धच्या यूथ टेस्ट मॅचमध्ये त्याने केवळ 1 विकेट घेऊन एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. असे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

गोलंदाजीतही वैभवची कमाल

आतापर्यंत वैभव सूर्यवंशी आपल्या बॅटने कमाल दाखवत होता. पण आता त्याने गोलंदाजीतही आपला जलवा दाखवून इतिहास रचला. इंग्लंड (England) अंडर-19 संघाविरुद्धच्या यूथ टेस्ट सामन्यात, वैभवने 6 षटके गोलंदाजी केली आणि इंग्लंडचा कर्णधार हमजा शेखची विकेट घेतली. ही विकेट घेताच त्याचे नाव इतिहासात नोंदवले गेले. यूथ टेस्टमध्ये भारताकडून सर्वात कमी वयात विकेट घेणारा तो खेळाडू बनला आहे. त्याने हा कारनामा अवघ्या 14 वर्षे आणि 107 दिवसांत करुन दाखवला आहे.

यापूर्वी, इंग्लंड अंडर-19 विरुद्धच्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतही वैभवने शतक झळकावले होते. त्याने 52 चेंडूत शतक ठोकत सर्वांनाच धक्का दिला होता. या शतकामुळे तो यूथ वनडेमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणारा खेळाडू बनला होता. त्याच्या शेवटच्या पाच डावांमध्ये त्याने 33, 143, 86, 45 आणि 48 धावा केल्या आहेत, जे त्याची सातत्यपूर्ण फलंदाजी दर्शवते.

आयपीएल 2025 मधील शानदार कामगिरी

आयपीएल 2025 मध्ये वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चमकदार कामगिरी केली होती. फ्रँचायझीने त्याला 1.1 कोटी रुपयांना विकत घेतले होते आणि त्याने आपल्या संघाला निराश केले नाही. 7 सामन्यांमध्ये त्याने 222 धावा केल्या होत्या, ज्यात 1 शतक आणि 1 अर्धशतकाचा समावेश होता. आयपीएलमध्ये (IPL) वैभवने 106.55 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली होती, तसेच सर्वात कमी वयात अर्धशतक आणि शतक करण्याचा विक्रमही त्याने आयपीएलमध्येच केला होता.

वैभव सूर्यवंशी हा भारतीय क्रिकेटमधील एक उगवता तारा असून, तो फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही आपले कौशल्य दाखवून भविष्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयास येत आहे. त्याच्या पुढील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'जीवन गेला तरी चालेल, पण रील बनलीच पाहिजे', जोडप्याने कालव्यात घेतली उडी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

AI Market: अमेरिकेला मागे टाकून भारत बनणार AI ची सर्वात मोठी बाजारपेठ; चॅटजीपीटीच्या CEO चं मोठं वक्तव्य

Train Robbery: कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लाटणारा सराईत चोरटा जेरबंद; 12.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Assembly Session: मर्दनगडावर उभारण्यात येणार संभाजी महाराजांचे स्मारक, गडाच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने दिले ठोस आश्वासन

Priyansh Arya Century: 7 चौकार, 9 षटकार! श्रेयस अय्यरच्या जोडीदाराचा धमाका, प्रियांश आर्याने ठोकले धमाकेदार शतक; नावावर केला नवा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT