Manish Jadhav
भारताचा 19 वर्षांखालील संघ सध्या इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची युवा एकदिवसीय मालिका खेळत आहे.
या मालिकेत वैभवने आतापर्यंत टीम इंडियासाठी फलंदाजीने उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने पहिल्या दोन सामन्यात शानदार फलंदाजी केली पण तिथे अर्धशतक झळकावण्यास तो हुकला.
पण तिसऱ्या सामन्यात त्याने तुफानी फलंदाजी करत 86 धावा केल्या. या डावात वैभवने 9 षटकार मारले. या शानदार खेळीच्या जोरावर त्याने एक रेकॉर्डही केला.
वैभव हा 19 वर्षांखालील युवा एकदिवसीय सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला. यापूर्वी, हा विक्रम राज बावा आणि मनदीप सिंग यांच्या नावावर होता, दोघांनीही 2022 मध्ये युगांडाविरुद्ध 8 षटकार मारले होते.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात वैभवने 31 चेंडूत 6 चौकार आणि 9 षटकारांसह 86 धावा केल्या.
यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 277.42 होता. त्याने धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला एक चांगली सुरुवात करुन दिली.
पहिल्या सामन्यात वैभवने 19 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांसह 48 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात त्याने 34 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 45 धावा केल्या. पाच सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.