पणजी: गोलंदाज, तसेच फलंदाजांनी निर्णायक क्षणी कच खाल्ल्यामुळे ४१व्या अखिल भारतीय उत्तराखंड गोल्ड कप क्रिकेट स्पर्धेत गोव्याला जम्मू-काश्मीरविरुद्ध शनिवारी ७३ धावांनी पराभव पत्करावा लागला. सामना देहरादून येथील आयुष क्रिकेट अकादमी मैदानावर झाला.
गोव्याने नाणेफेक जिंकून जम्मू-काश्मीरला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. त्यांनी ३११ धावा केल्या. हेरंब परब व कर्णधार दर्शन मिसाळ यांचा अपवाद वगळता गोव्याचे इतर गोलंदाज जम्मू-काश्मीरच्या फलंदाजांवर अंकुश राखू शकले नाहीत.
त्यानंतर, ईशान गडेकर (६६) व आर्यन नार्वेकर (५१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या १११ धावांच्या भागीदारीनंतर १ बाद १२२ धावांवरून गोव्याचा डाव ठरवीक अंतराने कोसळत गेला. गोव्याचा गट ४ मधील पुढील सामना केरळविरुद्ध २ जून रोजी खेळला जाईल.
संक्षिप्त धावफलक ः जम्मू-काश्मीर ः ५० षटकांत सर्वबाद ३११ (यावर हसन ६१, शुभमसिंग पुंडिर ५७, कन्हैया वाधवान ३७, आबिद मुश्ताक ३६, हेरंब परब १०-०-४६-३, शुभम तारी १०-०-८७-१, दर्शन मिसाळ १०-१-४८-२, फेलिक्स
आलेमाव ८-०-६७-३, मोहित रेडकर ८-०-४२-०, दीपराज गावकर ४-०-१४-१) वि. वि. गोवा ः ४१ षटकांत सर्वबाद २३८ (अझान थोटा २, ईशान गडेकर ६६, आर्यन नार्वेकर ५१, कश्यप बखले ५४, दर्शन मिसाळ १२, दीपराज गावकर ५, राजशेखर हरिकांत १, मोहित रेडकर २०, हेरंब परब १०, फेलिक्स आलेमाव नाबाद १, शुभम तारी १, आकिब नबी २-४०, सुनील कुमार २-३४, आबिद ३-४७, वंसज शर्मा २-३७).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.