Mumbai Cricket Stadium: क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी! मुंबईत साकारणार जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्टेडियम, मुख्यमंत्र्यांची माहिती

Second Large Cricket Stedium: भारतातील क्रिकेटप्रेमींसाठी आणि विशेषतः मुंबईतील चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईला आता आणखी एक भव्य क्रिकेट स्टेडियम मिळण्याची शक्यता आहे.
World’s Second Largest Stadium
World’s Second Largest StadiumDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: भारतातील क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. क्रिकेट क्षेत्रात नवनवीन उंची गाठणाऱ्या मुंबईला आता आणखी एक भव्य क्रिकेट स्टेडियम मिळण्याची शक्यता आहे. या स्टेडियमची बसण्याची क्षमता तब्बल १ लाख प्रेक्षकांपर्यंत असणार आहे, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

रोहित शर्मा स्टँड, अजित वाडेकर स्टँड आणि शरद पवार स्टँडच्या अनावरणप्रसंगी बोलताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुंबईसाठी प्रस्तावित नव्या क्रिकेट स्टेडियमविषयी सविस्तर माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, "वानखेडे स्टेडियमने ५० वर्षे पूर्ण केली आहेत. पुढील ५० वर्षे देखील ते आपल्या लौकिकाला साजेसं राहील. मात्र आता एक नवीन, अधिक मोठं आणि भव्य स्टेडियम उभारण्याची वेळ आली आहे."

World’s Second Largest Stadium
Best Time To Visit Goa: कोणत्या महिन्यात गोव्याला जावं? दोन दिवसांचा प्लॅन कसा असावा? Food, Stay ची संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, "माजी MCA अध्यक्ष दिवंगत अमोल काळे आणि अजिंक्य नाईक यांनी मला भेट दिली होती. त्यांनी १ लाख प्रेक्षक सामावणाऱ्या नवीन स्टेडियमबाबत आपली इच्छा व्यक्त केली. त्यावर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, जर तुम्ही हा प्रस्ताव पुढे आणलात, तर आम्ही सरकारच्या वतीनं आवश्यक ती जमीन देण्यास तयार आहोत."

जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं स्टेडियम?

जर हे प्रस्तावित स्टेडियम प्रत्यक्षात साकार झालं, तर ते अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम ठरेल.

नरेंद्र मोदी स्टेडियमची क्षमता सध्या १.३ लाख आहे. मुंबईच्या नव्या स्टेडियमसाठी प्रस्तावित १ लाख क्षमतेमुळे भारतातील आंतरराष्ट्रीय सामने, IPL आणि इतर महत्त्वाच्या स्पर्धांसाठी हे मैदान एक प्रमुख केंद्र बनू शकेल.

World’s Second Largest Stadium
Goa: गोव्यातील महागाई दुप्पट! सायबर गुन्हे वाढले, पर्यटक 40 % कमी झाले; सरदेसाईंचा सरकारवर घणाघात

क्रिकेटपटूंना सुवर्णसंधी

मुंबई हे शहर आधीच सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर यांसारख्या जागतिक दर्जाच्या क्रिकेटपटूंना घडवणारं शहर आहे. नव्या स्टेडियममुळे स्थानिक आणि युवा क्रिकेटपटूंना अधिक संधी उपलब्ध होतील आणि मुंबईचं क्रिकेट पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं आणखी सक्षम होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com