Goa Cricket, Ranji Cricket, Goa Ranji Dainik Gomatnak
गोंयचें खेळामळ

Goa VS Gujarat: गुजरातविरुद्ध गोव्याचा पराभव! मालिकेत दुसरा सामना गमावला; आता लढत झारखंडशी

State A Cricket Trophy: वीर यादव (४७) व जीवनकुमार चित्तेम (४०) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ५५ धावांच्या भागीदारी व्यतिरिक्त गोव्याच्या संघाला सावरणारी भागीदारी झाली नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरले, परिणामी २३ वर्षांखालील ‘स्टेट ए’ करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गुजरातने गुरुवारी सहा विकेट राखून सोपा विजय मिळविला. एलिट ब गटातील सामना गुरुवारी बडोदा येथील मोतिबाग क्रिकेट मैदानावर झाला.

प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर गोव्याचा डाव ४७.२ षटकांत १८६ धावांत संपुष्टात आला. वीर यादव (४७) व जीवनकुमार चित्तेम (४०) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ५५ धावांच्या भागीदारी व्यतिरिक्त गोव्याच्या संघाला सावरणारी भागीदारी झाली नाही. विजयासाठीचे १८७ धावांचे लक्ष्य सहज गाठताना गुजरातने ३४.४ षटकांतच ४ बाद १८९ धावा केल्या.

गोव्याचा हा तीन लढतीतील दुसरा पराभव ठरला. त्यामुळे त्यांचे चार गुण कायम राहिले. अगोदरचे दोन सामने गमावलेल्या गुजरातने पहिल्या विजयाची नोंद केली. त्यामुळे त्यांचे आता तीन लढतीतून चार गुण झाले आहेत. गोव्याचा पुढील सामना झारखंडविरुद्ध होईल.

संक्षिप्त धावफलक ः गोवा ः ४७.२ षटकांत सर्वबाद १८६ (वीर यादव ४७, सनथ नेवगी ४, आयुष वेर्लेकर ०, जीवनकुमार चित्तेम ४०, आर्यन नार्वेकर ३२, अमन धूपर १०, शिवेंद्र भुजबळ १, लखमेश पावणे नाबाद २३, कुतबुदिन जमादार १४, अनुज यादव ६, विनायक कुंटे १, भव्य चौहान ३-५३, निर्मल प्रजापती २-६, क्रिश गुप्ता २-२८, प्रिन्स भलाला २-४०) पराभूत वि. गुजरात ः ३४.४ षटकांत ४ बाद १८९ (अहान पोद्दार १०६, रुद्र पटेल २२, आदित्य रावल नाबाद २२, लखमेश पावणे ४-१-१६-०, विनायक कुंटे ५-०-२९-१, कुतबुदिन जमादार ८-०-४६-१, अनुज यादव १०-१-४८-१, अमन धूपर ४-०-२५-०, जीवनकुमार चित्तेम ३.४-०-२३-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bihar Election Result Memes: नेहरुंच्या वाढदिवसापासून 'पंचायत'मधील डान्सपर्यंत...! बिहार निकालावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस VIDEO

Pooja Naik: 'गोव्याचे लोक मला ओळखतात', ढवळीकरांनी दिली प्रतिक्रिया; पूजा नाईकच्या आरोपांवर नेमकं काय म्हणाले? पाहा VIDEO

"त्याला संघात का घेतलं?" टीम इंडियाच्या निवडीवर माजी क्रिकेटपटू संतापला, 'या' खेळाडूला वगळल्याने नाराजी

Jasprit Bumrah Record: W,W,W,W,W... 'बुमराह एक्स्प्रेस' सुसाट! आफ्रिकेविरुद्ध 5 विकेट्स घेत रचला इतिहास; अश्विनला टाकलं मागे Watch Video

Bihar Election Results 2025: 'बिहारच्या जनतेनचा पुन्हा PM मोदींवर विश्वास', मडगावात मुख्यमंत्री सावंतांनी कार्यकर्त्यांसोबत केला NDA चा विजयोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT