Aaron George  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND vs PAK: डोक्याला चेंडू लागला, पण मैदान सोडलं नाही, भारताचा 'फायटर' लढला; हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांची केली चांगलीच धुलाई VIDEO

U19 Asia Cup India Pakistan: अंडर-19 आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धकांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली.

Manish Jadhav

Aaron George 85 Runs: अंडर-19 आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धकांमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. दुबईतील या महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय संघाकडून सलामीवीर वैभव सूर्यवंशी लवकर बाद झाला असला तरी, आरोन जॉर्जने जबरदस्त फलंदाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

आरोन जॉर्जच्या डोक्याला चेंडू लागला!

पाकिस्तानकडून 14 वे षटक अली रझाने टाकले. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर आरोन जॉर्ज मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होता, परंतु चेंडू उसळी घेऊन थेट त्याच्या हेल्मेटला लागला. हेल्मेट असल्यामुळे त्याला मोठी दुखापत झाली नाही, मात्र त्याला वेदना होत असल्याचे स्पष्ट दिसत होते. घटनेनंतर लगेचच भारतीय संघाचे फिजिओ मैदानावर धावले आणि त्यांनी जॉर्जची तपासणी केली. त्याची 'कन्कशन टेस्ट' (Concussion Test) देखील करण्यात आली. डोक्याला चेंडू लागूनही जॉर्जने हिम्मत दाखवली आणि त्याने क्रीजवर टिकून राहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्याने पुढील काही षटकांत शानदार फलंदाजी केली.

आरोन जॉर्जची शानदार 85 धावांची खेळी

आरोन जॉर्ज पाकिस्तानविरुद्ध आपले शतक पूर्ण करण्यापासून केवळ 15 धावांनी चुकला. त्याने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दमदार खेळी खेळली. जॉर्जने 88 चेंडूंमध्ये 85 धावांची शानदार खेळी खेळली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 1 षटकार लगावला. जॉर्जच्या खेळीव्यतिरिक्त, कर्णधार आयुष म्हात्रे याने 25 चेंडूत 38 धावांचे उपयुक्त योगदान दिले. तसेच, अभिज्ञान कुंडूने देखील चांगली फलंदाजी करत 22 धावांची खेळी केली. 39 षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाने 7 गडी गमावून 210 धावांपर्यंत मजल मारली होती.

वैभव सूर्यवंशी ठरला फ्लॉप

या सामन्यात काही प्रमुख फलंदाज मोठी खेळी करु शकले नाहीत. विहान मल्होत्रा, खिलान पटेल आणि वेंदात त्रिवेदी यांना मोठी भागीदारी करण्यात अपयश आले. स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तो फक्त 5 धावा काढून लवकर बाद झाला. यापूर्वी झालेल्या युएईविरुद्धच्या सामन्यात सूर्यवंशीने 171 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली होती. त्याच्या याच जबरदस्त कामगिरीमुळे टीम इंडियाने तो सामना 234 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. मात्र, पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) तो फ्लॉप ठरल्याने चाहत्यांची थोडी निराशा झाली.

एकंदरीत, आरोन जॉर्जच्या जबरदस्त खेळीमुळे भारतीय संघाने (Team India) पाकिस्तानविरुद्ध एक सन्मानजनक धावसंख्या उभारली, ज्यामुळे आता गोलंदाजांवर प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याची जबाबदारी असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VHT 2025-26: विजय हजारे ट्रॉफीचा थरार! मुंबई-दिल्लीसह 8 संघ सज्ज; पाहा उपांत्यपूर्व फेरीचं संपूर्ण वेळापत्रक

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT