Cricket  X
गोंयचें खेळामळ

U 15 Cricket Tournament: गोव्याच्या मुलींचा अखेरच्या सामन्यातही पराभव! कर्णधार 'उस्मा'ची एकाकी झुंज

Goa VS Mumbai Cricket Match: स्पर्धेच्या अखेरच्या लढतीत गहुंजे-पुणे येथील क्रिकेट स्टेडियम संकुलाच्या दोन क्रमांक मैदानावर शुक्रवारी मुंबईने गोव्याला सात विकेट राखून हरविले. गोव्याच्या मुलींनी स्पर्धेतील एकमेव विजय सिक्कीमविरुद्ध ३१ धावांनी नोंदविला.

गोमन्तक डिजिटल टीम

U 15 Womens Cricket Tournament 2024 Goa VS Mumbai

पणजी: पुणे येथे झालेल्या १५ वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याला ड गटात पाचपैकी चार लढतीत पराभव पत्करावा लागला. फलंदाजीत फक्त कर्णधार उस्मा खान हीच लढली, बाकींना अननुभवाचा फटका बसल्यामुळे त्रेधातिरपीट उठाली.

स्पर्धेच्या अखेरच्या लढतीत गहुंजे-पुणे येथील क्रिकेट स्टेडियम संकुलाच्या दोन क्रमांक मैदानावर शुक्रवारी मुंबईने गोव्याला सात विकेट राखून हरविले. गोव्याच्या मुलींनी स्पर्धेतील एकमेव विजय सिक्कीमविरुद्ध ३१ धावांनी नोंदविला. उत्तर प्रदेशविरुद्ध गोव्याचा संघ अवघ्या २७ धावांत गारद झाला होता.

मुंबईविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाऱ्या गोव्याचा डाव ७९ धावांत संपुष्टात आला. त्यात उस्मा हिने ७५ चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. तिचे हे स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठरले. उस्माने तिसऱ्या विकेटसाठी आर्या परब हिच्यासमवेत ५४ धावांची भागीदारी केली. मात्र नंतर गोव्याने कर्णधारासह आठ विकेट फक्त तीन धावांत गमावल्यामुळे डाव २ बाद ७६ वरून ७९ धावांत आटोपला. अखेरच्या तीन विकेट सलग चेंडूवर टिपून मुंबईच्या अनिशा रौत हिने हॅटट्रिक साधली. मुंबईने आवश्यक ८० धावा ११.५ षटकांत तीन विकेटच्या मोबदल्यात केल्या.

संक्षिप्त धावफलक

गोवा ः २५.३ षटकांत सर्वबाद ७९ (मिहिरा कोळंबकर ०, अमिता शेट नार्वेकर ५, उस्मा खान ५२, आर्या परब ६, सृष्टी साळगावकर ०, तीर्था पाटणेकर ०, रिद्धी नाईक ३, विदिका सावंत ०, लक्ष्मी राठोड नाबाद ०, विपक्षा तारी ०, उमा धारगळकर ०, राजसी नागोसे ६-१-१७-५, अनिशा रौत ५.३-०-५-३) पराभूत वि. मुंबई ः ११.५ षटकांत ३ बाद ८० (साची लोंढे नाबाद ४८, उस्मा खान ४-०-१४-०, विदिका सावंत ४-०-३९-१, उमा धारगळकर २-०-१३-१, आर्या परब १.५-०-१४-०).

‘वन गर्ल आर्मी’

स्पर्धेत गोव्याच्या ५ डावांत एकूण ४११ धावा, त्यापैकी उस्मा खान हिच्या निम्म्या धावा

कर्णधार उस्मा हिच्या ५ डावांत ५१.५च्या सरासरीने २०६ धावा

एकूण ३ अर्धशतके; राजस्थानविरुद्ध ५७, सिक्कीमविरुद्ध नाबाद ६१, मुंबईविरुद्ध ५२ धावा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: तांबोशे झाले आता उगवे! 'ओंकार'मुळे शेतकरी त्रस्त; भातशेती, केळी, पोफळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Goa Politics: '2027 मध्ये भाजपचे 27 आमदार येणारच'! मुख्यमंत्र्यांचा ठाम विश्वास; तेंडुलकरांचे केले कौतुक

Goa Tourist: हुर्रे! 6 महिन्यांत 5.45 लाख पर्यटक; नव्या फ्लाईट्स, क्रूझमुळे फुलले पर्यटन

Goa Live Updates: कोलव्यात क्लिनिकला आग

Goa Tourism: बाईक रेंट कमी, शॅक उभारणी! गोव्‍यासमोर महाराष्‍ट्र, कर्नाटकचे आव्‍हान; पर्यटनक्षेत्रात वाढली स्पर्धा

SCROLL FOR NEXT