Tilak Varma Six Video Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND vs SA T20: तिलक वर्मानं लगावला 89 मीटरचा गगनचुंबी षटकार, चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर; व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमी थक्क!

Tilak Varma Six Video: युवा फलंदाज तिलक वर्मा 32 चेंडूत केवळ 26 धावा काढून बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला.

Manish Jadhav

Tilak Varma Six Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. परंतु, पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. या सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. मात्र तिलक वर्माने आपल्या खेळीदरम्यान गगनचुंबी षटकार लगावला.

तिलक वर्माचा गगनचुंबी षटकार

युवा फलंदाज तिलक वर्मा 32 चेंडूत केवळ 26 धावा काढून बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. तिलकने मारलेल्या या एकमेव षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भारताच्या डावातील 10व्या षटकात तिलकने हा षटकार मारला. दक्षिण आफ्रिकेकडून हे षटक एनरिक नॉर्खिया टाकत होता. नॉर्खियाच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तिलकने हा दमदार शॉट मारला. चेंडू बॅटला लागताच तो थेट स्टेडियमच्या बाहेर गेला. त्याने नॉर्खियाविरुद्ध 89 मीटर लांबीचा षटकार मारला, जो स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांना थक्क करणारा होता.

1000 धावांचा टप्पा पार

कटक येथील या संथ खेळीदरम्यानही तिलकने एक मोठी आणि महत्त्वाची वैयक्तिक कामगिरी नोंदवली. त्याने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 1000 धावांचा टप्पा पार केला. या सामन्यापूर्वी तिलक 1000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यापासून केवळ 4 धावा दूर होता. त्याने 4 धावा काढताच ही मोठी कामगिरी साधली. त्याने केवळ 34 डावांमध्ये ही शानदार कामगिरी केली. या विक्रमासह तिलक वर्मा हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा 13वा भारतीय फलंदाज ठरला. सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये असून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने प्रभावी कामगिरी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT